मुंबई
कोट्यवधींच्या हेरॉइनसह तिघांना अटक
कोट्यवधींच्या हेरॉइनसह तिघांना अटक
नालासोपारा, ता.१२ (बातमीदार): वसईत हेरॉइनची विक्री करणाऱ्या राजस्थानमधील तिघांना विरार क्राईम युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ करोड १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वसईच्या फादरवाडी रेंजनाका येथे हेरॉइन विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती विरार क्राईम युनिट तीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना शुक्रवारी (ता.११)मिळाली होती. या माहितीच्या आधारे एका कारमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस पथकाने झडती घेतली त्यांच्याकडे २ किलो ११ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. त्याची किमंत ८ कोटी १० लाख ५ हजारांचा घरात आहे. या प्रकरणात राजस्थानचे रहिवासी असलेले समुंदरसिंग देवडा, युवराजसिंग भवानीसिंग राठोड, तकतसिंग राजपूतला अटक करण्यात आली आहे.