वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर
वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर
३५० कॅमेरे बसविले जाणार; ठाणे पोलिस आयुक्तालयात आयटीएमएस तंत्रज्ञान कार्यान्वित
ठाणे, ता. १३ (बातमीदार) : ठाणे पोलीस आयुक्तालयातील चौकांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेसिस्त वाहनमालकांवर आता वाहतूक पोलिसांसोबतच तिसऱ्या डोळ्यांचीही नजर असणार आहे. ठाणे आयुक्तालयात वाहतूक विभागाकडून लवकरच आयटीएमएस तंत्रज्ञानाचा वापर करून सिसिटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून ठाण्यातील कॅडबरी चौकात पायलेट प्रोजेक्ट कार्यान्वयित करण्यात आला आहे.
या चौकात बारा स्वयंचलित कॅमेरे बसवले असून त्यांनी आतापर्यंत तीन हजार हून अधिक बेशिस्त वाहन चालकांना अचूक टिपले असून वाहतूक विभागाकडून त्यांना दंडात्मक चलन पाठवण्यात आले आहे. या आधुनिक आणि स्वचलित यंत्रणेमुळे बेशिस्त वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई प्रमाणेच आता ठाण्यातही वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर हायटेक पद्धतीने कारवाई होणार आहे. ठाणे वाहतूक विभागाकडून ठाणे पोलिस आयुक्तालयातील हद्दीत मुख्य १४ चौकांमध्ये आयटीएमएस तंत्रज्ञानाचा वापर करून सिसिटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
वाहतूक विभागागाकडून याकरिता ३५० कॅमेरे घेण्यात आले असून ठाण्यातील कापुरबावडी चौकातून पायलेट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात करण्यात आली आहे. १५ दिवसांत आयुक्तालयातील महत्वाच्या चौकांमध्ये ३५० कॅमेरे बसविले जाणार आहेत. चौकांमध्ये बसविण्यात आलेले कॅमेरे स्वयंचलित पद्धतीने वाहनांचे फोटो काढून ते वाहतूक नियंत्रण शाखेत पाठविणार आहेत. तेथून त्यांना दंड पाठवला जाणार आहे. दंड पाठवण्याच्या प्रक्रियेसाठी अवघे काही मिनिटे लागणार आहेत.
हे नियम मॉडेल्यास होणार कारवाई :
झेब्रा क्रॉसिंग जवळील स्टॉप लाईनवर वाहन उभे केल्यास, ट्रिपल सीट, सिग्नल तोडून पुढे गेल्यास, विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास होणार कारवाई.
चौकामध्ये बसविण्यात आलेले कॅमेरे आधुनिक असल्यामुळे परिसरात अंधार असला तरी ते नियम मोडणाऱ्या वाहनांचा फोटो काढून दंडाकरता पाठवणार आहेत.
ठाण्यातील कॅडबरी चौकात १२ कॅमेरे बसवले असून ३५० पैकी उर्वरित कॅमेरे डायघर, मुंब्रा, नौपाडा, ठाणे नगर, भिवंडी शहर, कोनगाव, नारपोली, शांतीनगर, कापूरबावडी, कासारवडवली आणि वागळे स्टेट येथील मुख्य चौकांमध्ये लावले जाणार आहेत.
कोट
ठाणे वाहतूक विभागात बेशिस्त वाहनचालकांवर आता वाहतूक कर्मचाऱ्यांसह 350 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. या कॅमेरा मार्फत वाहन चालकांनी चलन पाठवण्याची वेळ येऊ देऊ नये. वाहतूक नियमांचे पालन केले तर दंडातून सुटका होईलच परंतु यामुळे आपल्या व इतरांच्या जीविताला देखील धोका निर्माण होणार नाही. आता या कॅमेऱ्यामुळे वाहतूक कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये वाद होण्याचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.
पंकज शिरसाट, उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.