पितांबरीचे फिरते दुकान ठाणेकरांच्या सेवेत !
ठाण्यात पितांबरीचे फिरते दुकान
ठाणे, ता. १३ : पितांबरी शॉपी या अभिनव संकल्पनेनंतर पितांबरीचे फिरते दुकान आता ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. नुकतेच या दुकानाचा उदघाटन सोहळा पितांबरीच्या ठाणे कार्यालयाच्या आवारात पार पडला.
पितांबरीची रोजच्या वापरातील ७० हून अधिक दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली ग्राहकांना मिळावीत या हेतूने पितांबरीने गोखले रोड येथे सुरु केलेल्या पितांबरी शॉपीला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून ग्राहकांच्या दारात उत्पादने पोहचावीत या उद्देशाने पितांबरीचे फिरते दुकान हा उपक्रम आता सुरु करण्यात आला आहे.
या फिरत्या दुकानामध्ये पितांबरीची पौष्टिक व चविष्ट अशी खाद्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. यात पितांबरी रुचियाना बेकरी प्रॉडक्ट्स, कुकीज, सॉस आणि पिकल रेंज, गुलकंद, आवळा सॉल्टेड, जिंजर कँडी, चटण्या तसेच रेडी टू मेक सूप्स असे विविध पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे सर्व उत्पादनांवर ग्राहकांना १० टक्के सवलतही मिळणार आहे. पितांबरीचे हे फिरते दुकान संपूर्ण ठाणे शहरात कार्यरत असणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ग्राहकांना ही उत्पादने खरेदी करता येतील. ठाणेकरांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन पितांबरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांनी केले.