राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ९ हजार प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ९ हजार प्रकरणे निकाली

Published on

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नऊ हजार प्रकरणे निकाली
६० कोटी ४२ लाख ८३ हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने शनिवारी (ता.१३) रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या उपस्थितीत दुकश्राव्य माध्यमाद्वारे करण्यात आले.
लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, वादपूर्व व दाखल अशी एकूण नऊ हजार ६५० प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश तेजस्विनी नैराळे यांनी दिली आहे. राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ४४ हजार १८७ वादपूर्व प्रकरणे व १३ हजार ६७८ प्रलंबित अशी एकूण ५७ हजार ८६५ प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी पाच हजार ५८२ वादपूर्व प्रकरणे व चार हजार ६८ प्रलंबित प्रकरणे, अशी एकूण नऊ हजार ६५० प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोकअदालतीमध्ये निकाली निघाली असून, त्याद्वारे पक्षकारांना एकूण ६० कोटी ४२ लाख ८३ हजार ६३७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध न्यायालयात २६ लोकअदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलचा वापर करूनसुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली.
...............
चौकट :
पाच जोडप्यांचा संसार जुळला :
जिल्ह्यातील लोकन्यायालयात पाच जोडप्यांचा (रोहा-१, पाली-१, श्रीवर्धन-१, पनवेल-१, अलिबाग-१) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी मनोमिलन झालेल्या जोडप्यांचे अभिनंदन केले.
...............

चौकट :
मोटार अपघात प्रकरणही निकाली :
मोटार अपघात प्रकरणांमध्ये चार कोटी ४३ लाख ४९ हजार १०० रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर जिल्ह्यामध्ये एकूण ४७ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून, पक्षकारांना चार कोटी ४३ लाख ४९ हजार १०० इतकी नुकसानभरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com