जुन्या वाहनांवर अजूनही काका, मामा, दादा नंबर

जुन्या वाहनांवर अजूनही काका, मामा, दादा नंबर

Published on

जुन्या वाहनांवर अजूनही काका, मामा, दादा नंबर
मुंबईत ६७८२ वाहनांची तपासणी; ६५ वाहनांना दंड, ६५ हजारांची वसुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १४ : जुन्या वाहनांवर अजूनही काका, मामा, दादा नंबर आढळून येत आहेत. मुंबईत ६,७८२ वाहनांची तपासणी केली, त्यामध्ये ६५ वाहनचालक दोषी आढळले. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत दोषीचालकांकडून ६५ हजार दंडाची वसुली करण्यात आली आहे.

राज्यात एप्रिल, २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) नसल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने (आरटीओ) दिले आहेत. यासोबतच एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर काका, मामा, दादा असे नंबर टाकलेली वाहने आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१९ नंतरच्या एचएसआरपी नसलेल्या गाड्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्यात २०१९ नंतर नोंदणी झालेल्या नव्या वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक असताना अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याने परिवहन आयुक्तालयाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकारी म्हणाले. सर्व वाहनांची तपासणी करून कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे घट
दुचाकी, चारचाकी तसेच खासगी वाहने यांच्या नंबर प्लेटवर यापूर्वी वेगवेगळ्या डिझाइन करून नंबर टाकले जात हाेते. त्यात दादा, नाना, बाॅस यासह अन्य काही मजकूर टाकला जात हाेता. परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनांची तपासणी केली जाते. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविल्यामुळे त्यावर काेणत्याही विशिष्ट नंबर वेगळ्या पद्धतीने टाकता येत नाही. परिणामी नंबर प्लेट साध्या पद्धतीची बसवावी लागत असल्याने विशिष्ट नंबरची मागणी घटली आहे.

वाहन कायद्यानुसार एक हजारांचा दंड
एप्रिल २०१९ अगोदर नोंदणी झालेल्या गाड्यांवर एचएसआरपी लावण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

एप्रिल ते जुलै कारवाई आकडेवारी
आरटीओ- तापसलेली वाहने - दोषी वाहने - दंड (हजारात)
ताडदेव -५५०२ -१५ - १
अंधेरी - ८४० - ३० -६०
वडाळा - ४४० -२० - ५

राज्यातील २०१९ पूर्वी झालेल्या सर्व गाड्यांना एचएसआरपी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु २०१९ पूर्वीच्या फॅन्सी नंबरची वाहने रस्त्यांवर धावत असल्याने केवळ अशाच वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com