खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजतच 
खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजतच 
खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजतच

खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजतच खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजतच खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजतच

Published on

जागेअभावी ग्रामीण रुग्णालयाचे काम रखडले
मागील ११ वर्षांच्या मागणीनंतर मागील वर्षी दिली मंजुरी
मोखाडा, ता. १४ : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही मुख्य महत्त्वाची बाजारपेठ आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातील गावपाड्यांसह लगतच्या जव्हार, शहापूर, वाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे आरोग्य केंद्रावर रुग्णांची नियमित गर्दी असते. येथे अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मागील ११ वर्षांच्या मागणीनंतर ग्रामीण रुग्णालयाला गत साली मंजुरी मिळाली आहे. मात्र ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे घोंगडे भिजत पडले आहे.
खोडाळा गाव व परिसरातील वाढत्या लोकसंख्येसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत २४ महसुली गावे आणि जवळपास ६० गावखेडी येतात. त्यांची लोकसंख्या ३० हजारांच्या पुढे आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट, देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजुली, सामुंडी ते थेट पहिणा या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रुग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. याबरोबर शहापूर तालुक्यातील विहीगांव, माळ, दापूरवाडा तालुक्यातील तीळमाळ, भिलमाळ, ओगदा आणि जव्हार तालुक्यातील भुरीटेक गावासह लगतच्या खेडोपाड्यातील रुग्णांचा भारही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला सोसावा लागतो आहे. आरोग्य केंद्रात नियमित कुटुंब नियोजन शिबिरांसह इतर वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात असते. वाढणारा रुग्णांचा भार लक्षात घेऊन खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी येथील नागरिकांनी पालघर जिल्हा निर्मितीनंतर ११ वर्षांपासून केली आहे. त्याबाबतचे सर्व सरकारी सोपस्कार पार पाडल्यानंतर अखेर २०२४ मध्ये खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे.

चौकट
तब्बल २१ उपकेंद्रांची उपाययोजना
मोखाडा तालुक्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे ४, आरोग्य पथके, दक्षता पथके ३, रेस्क्यू कॅम्प ७, आयुर्वेदिक दवाखाना १ आणि तब्बल २१ उपकेंद्रांची उपाययोजना केली आहे. त्यापैकी खोडाळा विभागात १ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३ आरोग्य पथके, ६ उपकेंद्रे आणि दोन रेस्क्यू कॅम्पच्या माध्यमातून जुजबी आरोग्यसेवा कार्यरत आहे. मात्र येथील आम रुग्णांना अधिकची आरोग्यसेवा मिळविण्यासाठी जव्हार अथवा नाशिक येथील जिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उत्तम आरोग्यसेवा मिळावी शासनाने यासाठी खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली आहे.

कोट
खोडाळा ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीने सुचवलेल्या ५२८ आणि ५९८ या दोन गट क्रमांकांच्या जागेची मोजणी, भूमी अभिलेख कार्यालयाकडून २७ मे रोजी करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतची कागदपत्रे अजूनही आमच्याकडे उपलब्ध झालेली नाही.
- भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com