इमारतीच्या आवारातील वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त

इमारतीच्या आवारातील वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त

Published on

विजयनगरात पोलिसांचा सोसायटीकडून सत्कार
इमारतीच्या आवारातील वाहनांची तोडफोड करणाऱ्यांचा बंदोबस्त
कल्याण, ता. १४ (बातमीदार) : जुलै महिन्यात सहा अज्ञात व्यक्तींनी विजयनगर येथील साई गणेशधाम या इमारतीच्या आवारातील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. हे प्रकरण सकाळनेही लावून धरले होते. त्यानंतर या गुन्ह्याचा कसोशीने शोध घेऊन गुन्हा उघड करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा साई गणेशधाम सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत जाहीर सत्कार करत पोलिस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
विजयनगरमधील सेंट थॉमस शाळेसमोरील रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक वाहने उभी केलेली असतात, परंतु या अज्ञातांनी फक्त साई गणेश धाम परिसरातीलच वाहनांना लक्ष्य करून वाहनांची तोडफोड केली होती. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या आधारे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्हायदे, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव, भागवत सौदाणे, दिलीप दराडे, विलास जनक यांनी विजय नगर ते उल्हासनगर कॅम्प नं. चारपर्यंतचे सीसीटीव्ही तपासून यामध्ये एकूण सहा जणांचा शोध लागला होता. पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे विजयनगर परिसर दहशतमुक्त झाला. पोलिसांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा सत्कार करण्यात आल्याचे ज्येष्ठ सदस्य अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
या समयी आपल्या सत्काराला उत्तर देताना गणेश न्हायदे यांनी सांगितले की, आजपर्यंतच्या सेवा काळात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे उघड करून गुन्हेगारांना शासन करण्यात आपण यशस्वी झालो आहोत, परंतु साई गणेशधाम या सोसायटीने आमच्या कार्याची दखल घेऊन माझ्यासह सहकाऱ्यांचा सत्कार केला तो कायमस्वरूपी स्मरणात राहील. प्रत्येक सोसायटीने आपल्या सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवून घेणे गरजेचे आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या सोसायटीबाहेरील रस्त्यावरही किमान एक तरी कॅमेरा लावावा, असे आवाहनही न्हायदे यांनी केले आहे. यासमयी सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com