सर्व जिल्हा बोर्ड सक्षम होतील

सर्व जिल्हा बोर्ड सक्षम होतील

Published on

सर्व जिल्हा बोर्ड सक्षम होतील
प्रविण दरेकर यांचा विश्वास
मुंबई, ता. १३ : येत्या वर्ष-दोन वर्षाच्या काळात राज्य संघासह सर्व जिल्हा बोर्ड हे अत्यंत सक्षम झालेले असतील, असा विश्वास भाजपा गटनेते, मुंबई बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी (ता. १३) यांनी व्यक्त केला. ते मुंबई सहकारी बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
देशाच्या सहकाराला दिशा देण्याचे काम राज्याच्या सहकाराने केले. पण अलीकडच्या काळात आपण मागे जात राहिलो. ते गतवैभव पुन्हा राज्यातील सहकाराला आणायचे आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील लोकं सहकाराचे नेतृत्व करत होते. आता राज्याच्या सहकाराचे नेतृत्व मुंबईतील माझा सहकारातील कार्यकर्ता करेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
सहकारासाठी झोकून देऊन काम केले पाहिजे. सहकार ही राज्याची मोठी ताकद आहे. मुंबईतील पतसंस्था, अर्बन बँका एकत्रित येऊन आखणी केली तर मुंबईचे चित्र बदलण्याची ताकद आपल्या सहकारात आहे. लाडक्या बहिणींसाठी आपल्या जिल्हा बँकेने उद्योग व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना आणली. आज शेकडो महिलांना व्यवसायासाठी एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले आहे, असेही दरेकर यांनी यावेळी दाखवून दिले.
मुंबईत दोन तीन प्रशिक्षण केंद्रे आहेत. मुंबईसारख्या आर्थिक शहरात दर्जेदार प्रशिक्षण देत नसू तर आपले प्रशिक्षण घ्यायला कोण येईल ? प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक घ्यावे लागतील. त्यांना प्रसंगी वेतन देण्याचीही व्यवस्था करू पण सहकाराच्या ताकदीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. सहा महिन्यात चित्र बदललेले शंभर टक्के दिसेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

सहकाराला गतवैभव आणू
दरेकर पुढे म्हणाले की, सहकारात संघटित ताकद निर्माण झाली नाही. आगामी काळात निश्चितपणे आपण वेगवेगळे प्रयोग करणार आहोत. मुंबईत स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मोठमोठ्या घरात लोकं राहायला गेली आहेत. हा चमत्कार आपण सहकारातील लोकच करू शकतो. भविष्यात मुंबईच्या सहकारासाठी जेव्हा आम्ही हाक मारू त्यावेळी आपण ताकदीने या. तुमच्या ताकदीवर मुंबईच्या सहकाराला गतवैभव नक्की आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईची अर्थव्यवस्था सहकाराच्या ताब्यात हवी
दरेकर म्हणाले की, मुंबईत सहकारी संस्था ताकदवान, सशक्त झाल्या पाहिजेत. स्पर्धेच्या बदलत्या युगात आपल्याला गुणवत्तेशी तडजोड करता येणार नाही. मुंबईतील अर्थव्यवस्थेवर सहकाराचा पगडा हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com