अंबरनाथ नाट्यगृहाला ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’ द्या

अंबरनाथ नाट्यगृहाला ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’ द्या

Published on

अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेले अंबरनाथ व परिसरातील कलावंतांसाठीचे भव्य व अत्याधुनिक नाट्यगृह लवकरच उपलब्ध होणार आहे. औद्योगिक, धार्मिक, सांस्कृतिक व समृद्ध नाट्यपरंपरेसाठी ओळखले जाणारे अंबरनाथ आता आधुनिक नाट्यमंदिरामुळे सांस्कृतिक क्षेत्रातही नवीन उंची गाठणार आहे. त्यामुळे या नाट्यगृहाला ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक, सांस्कृतिक, धार्मिक व कलाविश्वातील प्रगतीत मोलाचे योगदान असलेले शिवसेनाप्रमुखांचे जिवलग सहकारी व जनतेचे लाडके नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने अंबरनाथ पश्चिमेला सर्कस ग्राउंडवर बांधलेल्या या नाट्यमंदिराचे नामकरण करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
मराठी कलावंतांना रंगभूमीवर न्याय मिळावा, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात धर्मवीर आनंद दिघे यांचे मोठे योगदान होते. कलावंतांना सदैव पाठबळ देणारे, संकटसमयी खंबीरपणे उभे राहणारे योद्धा म्हणून आनंद दिघे यांचे कार्य आजही जनतेच्या मनात घर करून आहे. नाट्यमंदिराला ‘धर्मवीर श्री आनंद दिघे नाट्यमंदिर’ असे नाव द्यावे, अशी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नाट्यप्रेमींनी मागणी केली आहे. दरम्यान, नामकरणाचा निर्णय लवकरच सकारात्मकपणे निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com