सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेत मुरूड संघ अव्वल

सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेत मुरूड संघ अव्वल

Published on

सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेत मुरूड संघ अव्वल
पोलिस, मच्छीमार बांधवांमध्ये खेळातून एकोप्याचा संदेश
मुरूड, ता. १५ (बातमीदार) ः रायगड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी सुरक्षा चषक २०२५ कबड्डी साखळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला १२ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, ती २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील तब्बल १५ संघ या स्पर्धेत उतरले आहेत.
या अनुषंगाने १४ सप्टेंबर रोजी मुरूड समुद्रकिनारी झालेल्या सामन्यांत प्रबळ खेळाचा प्रत्यय आला. उद्घाटन सोहळा नायब तहसीलदार संजय तवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून पार पडला. या वेळी पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष मनोहर बैले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, शिवसेनेचे तालुका संघटक यशवंत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील पहिला सामना मुरूड व तळा संघ यांच्यात रंगला. चुरशीच्या या लढतीत मुरूड संघाने सरशी साधली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मुरूडचा सामना रोहा संघाशी झाला. रोहा संघाने प्रखर प्रतिकार केला तरी मुरूड संघाने एकाच गुणाच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सलग दोन विजय मिळवत मुरूड संघाने ‘सागरी सुरक्षा चषक २०२५’ मधील अव्वलपद पटकावले.
.............
पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की, या स्पर्धेचे उद्दिष्ट केवळ विजय नव्हे तर पोलिस, सागरी सुरक्षा दल व मच्छीमार बांधव यांच्यातील परस्पर एकोपा वाढवणे आहे. खेळातून संघभावना, शिस्त आणि समन्वय वृद्धिंगत होतो. त्यामुळे अशा उपक्रमांना मोठे सामाजिक महत्त्व आहे. या स्पर्धेमुळे मच्छीमार बांधव आणि पोलिस दल यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक बळकट होत असून, सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुरूड संघ आता पुढील सामने अलिबाग येथे खेळणार असून, त्यांच्याकडून आणखी दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com