मेट्रो स्थानक रस्त्याला नदीचे स्वरूप

मेट्रो स्थानक रस्त्याला नदीचे स्वरूप

Published on

मेट्रो स्थानक परिसरांना फटका
खारघर, ता. १५ (बातमीदार) : खारघर डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे आरबीआय ते बेलपाडा मेट्रो स्थानक रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. हा रस्ता जलमय झाल्यामुळे सीबीडीकडून खारघरकडे जाणारी वाहने सीबीडीकडे रस्त्यावर वळवण्यात आली होती.
रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खारघर वसाहतीमधील रस्ते जलमय झाले होते. अशातच खारघर डोंगरातून वाहून आलेल्या पावसामुळे सीबीडी सेक्टर-५ मधील आरबीआय मेट्रो स्थानक ते बेलपाडा मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. सीबीडीकडून खारघरला जाणारी वाहने, खारघर सीबीडी मार्गे वळविण्यात आल्याने येथे कोंडी झाली होती. रस्ता जलमय झाल्याने काही दुचाकी बंद पडल्या होत्या, तर सांडपाणी वाहून नेणारी गटारे तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

Marathi News Esakal
www.esakal.com