सिंगापूर येथील कार्यशाळेसाठी पक कुलकर्णी यांची निवड

सिंगापूर येथील कार्यशाळेसाठी पक कुलकर्णी यांची निवड

Published on

सिंगापूर येथील कार्यशाळेसाठी दीपक कुलकर्णी यांची निवड
विरार, ता.१५ (बातमीदार) : सिंगापूर हा प्रगत देश असून शिक्षण क्षेत्रामध्ये या देशाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येथे तीन दिवसाच्या शैक्षणिक कार्यशाळेसाठी भारतातून ४३ शिक्षण तज्ञांची निवड झाली होती. त्यामध्ये विरार मधील नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दीपक कुलकर्णी यांचा समावेश होता. प्रत्येक दहा वर्षानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये अद्यावत राहण्यासाठी नवीन शिक्षण प्रणालीचा समावेश केला जातो. त्यानुसार ''लाईफ लाँग लर्निंग साठी शिक्षण'' अशी संकल्पना संपूर्ण सिंगापूरमध्ये कार्यान्वित केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या विद्यापीठात तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथितयश प्राध्यापकांची व्याख्याने, आंतरराष्ट्रीय शिक्षणामध्ये घडणारे बदल, कॉर्पोरेट प्राथमिक शाळेला भेट देऊन त्या शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला गेला. तसेच यीशून सेकंडरी या शाळेला भेट देऊन शाळेने अंगीकारलेल्या शैक्षणिक पद्धती उपयुक्त कशा आहेत याचा आढावा सर्व शिक्षण तज्ञांना घेता आला. एकूणच ही कार्यशाळा प्रभावी झाली आणि याचा उपयोग सर्व सहभागींना होईल अशी आशा प्रत्येकाने व्यक्त केली.

Marathi News Esakal
www.esakal.com