पावसाळी आजारांचा कहर
पावसाळी आजारांचा कहर
मुंबईत सर्वाधिक रुग्ण; राज्यात ३२ मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्यात पावसाळी आजारांचा कहर सुरू असून, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षी राज्यात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मलेरियाचे १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मलेरियाने तब्बल १२ जणांचा जीव घेतला आहे. दुसरीकडे डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू, लेप्टो आणि इतर आजार एकत्रितपणे दुहेरी हल्ला करीत आहेत. सध्या मुंबईत पावसाळी आजारांच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात मलेरियाचे एकूण १५,२४५ रुग्ण आढळले असून, दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूचा कहरही कमी झालेला नाही. आतापर्यंत एकूण ७,३४६ जणांना त्याचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे स्वाइन फ्ल्यूने ७१८ जणांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये हा आजार चिंताजनक आहे. चिकनगुनियाचे २,२३४ रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे ५६४ रुग्ण आणि अतिसार, टायफॉइड, गॅस्ट्रो, कावीळ, स्क्रब टायफस आणि जपानी तापाचे डझनभर रुग्ण राज्यात आढळले आहेत.
या जिल्ह्यांमधील रुग्णांचे मृत्यू
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अकोल्यात कॉलरामुळे १, पालघरमध्ये गॅस्ट्रोमुळे २, अहिल्यानगर आणि कोल्हापूरमध्ये कावीळमुळे ३ आणि चंद्रपूरमध्ये स्क्रब टायफसमुळे १ मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यात आतापर्यंत एकूण ३२ मृत्यू झाले आहेत.
मुंबईत रुग्णांची वाढ
मुंबईतील साथीच्या परिस्थितीने मर्यादा गाठली आहे. आकडेवारीनुसार शहरात मलेरियाचे ६,००४, डेंग्यूचे २,४२५, स्वाइन फ्लूचे २५३, चिकनगुनियाचे ३५६ आणि लेप्टोस्पायरोसिसचे ५०० रुग्ण आढळले आहेत. हजारो रुग्णांसह रुग्णालये आणि दवाखान्यांवरचाही ताण वाढला आहे.
राज्यातील रुग्णांची संख्या
मलेरिया - १५,२४५ रुग्ण, १२ मृत्यू
डेंग्यू - ७,३४६ रुग्ण, शून्य मृत्यू
स्वाइन फ्ल्यू - ७१८ रुग्ण, ३ मृत्यू
चिकनगुनिया - २,२३४ रुग्ण, शून्य मृत्यू
लेप्टोस्पायरोसिस - ५६४ रुग्ण, शून्य मृत्यू
कलेरा - २५ रुग्ण, १ मृत्यू
गॅस्ट्रो - ५२ रुग्ण, २ मृत्यू
अतिसार - ७६२ रुग्ण, शून्य मृत्यू
कावीळ - ६७० रुग्ण, ३ मृत्यू
विष्म ताप - २२ रुग्ण, शून्य मृत्यू
स्क्रब टायफस - ३६ रुग्ण, १ मृत्यू
जपानी ताप - ३ रुग्ण, १ मृत्यू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.