तळोजा वसाहतीत टँकरवर भिस्त
खारघर, ता. १६ (बातमीदार) : परतीचा पाऊस सुरू झाला आहे, मात्र तळोजा वसाहतीतील पाणी समस्या दूर होताना दिसत नाही. अजूनही रहिवाशांना टँकरवर तहान भागवावी लागत असून, तळोजा नोडमधील लोकसंख्येचे पूर्वावलोकन करून लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची तरतूद केली जात नसल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तळोजा वसाहतीमधील पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी रहिवासी अनेक वर्षांपासून मोर्चे, आंदोलन करीत आहेत, मात्र सिडकोकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचे दिसून येते. आठ दिवसांपासून तळोजा वसाहतीमध्ये पुरेसे पाणी येत नसल्यामुळे टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासंदर्भात सिडको पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, तळोजा वसाहतीत जाणारी जलवाहिनीला रेल्वे ट्रॅकखाली गळती लागली होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे कामात अडथळा निर्माण झाला. आता गळतीचे काम पूर्ण झाले असून, नियमितपणे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.
-----------------------------
आश्वासनांचा विसर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून नाव्हा-शेवा टप्पा तीन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यांनतर सिडकोला ६९ दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच तळोजा नोड येथील लोकसंख्येचे पूर्वावलोकन करून पाण्याची तरतूद करण्यात येईल, तळोजा वसाहतीमधील जलकुंभ येथे जलमापक बसवण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. सेक्टर-३७ मध्ये जलकुंभ प्रस्तावित असल्याचे सांगितले होते.
-------------------------------
तळोजा वसाहतीमधील पाणी समस्यासंदर्भात नगरविकास विभाग, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि फेडरेशनची बैठक होणार आहे. या बैठकीत समस्या मार्गी लागली नाही, तर मंत्रालयासमोर आंदोलन केले जाईल.
- प्रसाद पाटील, पदाधिकारी, तळोजा हौसिंग फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.