जंजिऱ्याला मुहूर्त २ ऑक्टोबर चा

जंजिऱ्याला मुहूर्त २ ऑक्टोबर चा

Published on

पर्यटकांसाठी आनंदवार्ता
जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यातः लवकरच खुली होणार
मुरुड, ता. १३ (बातमीदार) ः ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरीवरून शिडाच्या होडीने जावे लागते. देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक या अजोड शिल्पाचा नमूना पहायला येत असतात. या किल्ल्यावर बोटीने उतरण्यासाठी सुसज्ज अशा जेटीचे काम सुरु असून ९७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मेरी टाईम बोर्डाकडून देण्यात आली.
जंजिरा किल्ला हा भर समुद्रात असल्याने राजपुरी व खोरा बंदर आणि दिघी जेट्टीवरून इंजिन होडी वा शिडाच्या बोटींनी जावे लागते. परंतु, किल्ल्यावर बोटीने उतरण्यासाठी सुसज्ज अशी जेट्टी नाही. त्यामुळे पर्यटकांना बोटीतून उतरताना फार त्रास सहन करावा लागतो. विशेषत: लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागते. त्याअनुषंगाने जेट्टीची निकड लक्षात घेता मेरी टाईम बोर्डाने जंजिरा जेट्टीच्या प्रस्तावास प्रशासकिय मान्यता देत तब्बल १११ कोटी ४१ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे.

अशी जेट्टीची रचना
जंजिऱ्याच्या पाठीमागे २५० मीटर लांबीचा लाटरोधक बंधारा, ४८ बाय ७.५ मीटरची पाईल जेट्टी आणि २० मीटर बाय २.५ मीटरची ॲल्युमिनियम गँगवे अशी तयार करण्यात आली असून या कामी सागरमाला योजनेअंतर्गत
केंद्र शासनाचा ५० टक्के हिस्सा तर राज्य हिस्सा ५० टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सद्यस्थितीत या जेट्टीचे ९७ टक्के काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याची माहिती मेरी टाईम बोर्डाकडून देण्यात आली. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ही जेट्टी पर्यटकांसाठी खुली झाल्यास पर्यटकांना होणारा त्रास कमी होणार आहे.

३०० कुटुंबाची उपजीविका प्रवासी वाहतुकीवर निर्भर
जंजिरा किल्ल्यावर बोटींनी जावे लागते. सुमारे २५० ते ३०० कुटुंबाची उपजीविका या किल्ल्यावरील प्रवासी वाहतुकीवर निर्भर आहे. सुसज्ज अशी जेट्टी उभारल्याने पर्यटकांचा ओघ वाढून रोजगार उत्पन्न होणार आहे.

जंजिऱ्याला २ ऑक्टोबरचा मुहूर्त
वादळी हवामानामुळे मे महिन्याच्या अखेरीस पर्यटकांची सुरक्षा म्हणून पुरातत्व खात्यातर्फे बंद करण्यात आला होता. पावसाळी किल्ल्यात झाडेझुडपे, गवताचे कुरण वाढल्याने साफसफाई हा दरवर्षाचाच एक कार्यक्रम असतो. अनंत चतुर्दशीनंतर स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर करण्यात आली असून किल्ल्याचे दरवाजे महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर पर्यटकांसाठी खुले करणार असल्याची माहिती पुरातत्व खात्याचे सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर यांनी दिली.
.
सोबत - फोटो १ . जंजिऱ्याची स्वच्छता
२ . लाट रोधक जेट्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com