ठाणे - नवी मुंबई सीमलेस एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरला सरकारचा हिरवा कंदील
ठाणे-नवी मुंबई सीमलेस एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरला मंजुरी
सिडकोच्या २५ किमी कॉरिडॉरने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : ठाणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) यांना जोडणाऱ्या नवीन सीमलेस एलिव्हेटेड रोड कॉरिडॉरला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. सिडकोचा हा २५.२ किमी लांबीचा सहा लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प ठाणे आणि वायव्य उपनगरांतील प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मंत्रिमंडळ समितीने मंजूर केलेला हा धोरणात्मक प्रकल्प मुंबई महानगराची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
हा कॉरिडॉर थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार असून, त्याद्वारे प्रवाशांना ठाणे कोस्टल रोड भाग २ आणि कोपरी-पटणी पुलामार्गे अखंड व जलद प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे या कॉरिडॉरमध्ये सहा प्रमुख इंटरचेंज प्रस्तावित असून, ते कोपरी-पटणी पूल, घणसोली-ऐरोली क्रीक ब्रिज, कांजूरमार्ग–कोपरखैरणे लिंक रोड, वाशी येथील सायन–पनवेल महामार्ग, पाम बीच रोड आणि उलवे कोस्टल रोड या प्रमुख दुव्यांना जोडतील. हे इंटरचेंज मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान पूर्व–पश्चिम तसेच उत्तर–पश्चिम दळणवळण सुलभ करतील. यामुळे हा कॉरिडॉर या भागासाठी एक महत्त्वाचा गतिशीलता दुवा ठरेल. हा उन्नत मार्ग उलवे कोस्टल रोडला जोडला जाणार असून, पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनसशी एका उन्नत लिंकद्वारे थेट कनेक्ट होईल. संपूर्ण मार्ग १०० किमी/ताशी वाहनांच्या वेगासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय बचत होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे ६,३६३ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, हा प्रकल्प सिडको, बीओटी व पीपीपी तत्त्वावर व्हीजीएफ मोडसह साकारण्यात येणार आहे. हा कॉरिडॉर केवळ विमानतळाशी कनेक्टिव्हिटीच नाही, तर ठाणे आणि नवी मुंबईमधील वाहतुकीवरील ताण कमी करण्यातही मोलाची भूमिका बजावेल.
ठाण्याहून ४० मिनिटांत विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केवळ मुंबईच नव्हे तर ठाण्याच्या दिशेनेदेखील सुलभ कनेक्टिव्हिटी असणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) व ठाणे यांना जोडणारा नवीन सीमलेस एलिव्हेटेड रोड कॉरिडॉर सिडकोतर्फे साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानचा सध्याचा दीड तासाचा प्रवास वेळ अंदाजे ४० मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.