पूरग्रस्तांना दिलासा द्या
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील वडोलगाव, सम्राट अशोक नगर, रेणुका सोसायटी आणि आशिर्वाद सोसायटी परिसरात मुसळधार पावसामुळे घरे जलमय झाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोरगरीब कुटुंबे अद्यापही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन सेनेने तहसीलदार कार्यालयाकडे केली आहे.
२० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अचानक आलेल्या या पूरस्थितीमुळे घरगुती साहित्य, अन्नधान्य, कपडे तसेच फर्निचरचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची उपजीविका धोक्यात आली असून, आजवर प्रशासनाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ऍड. किरण सिद्धार्थ जाधव यांनी उल्हासनगर-५ मधील गांधी रोड येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले. यामध्ये त्यांनी तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून बाधितांना मदत द्यावी अशी मागणी केली.
गोरगरीब नागरिकांचे आयुष्य या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. आजवर त्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. शासनाने या लोकांचे अश्रू पुसले नाहीत, तर नागरिकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होईल, असा इशारा ऍड. जाधव यांनी दिला. नागरिकांनीही प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने मदत न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.