रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात वार्षिक शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा
रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात वार्षिक शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः हिंदी विद्या प्रचार समिती संचालित रामनिरंजन झुनझुनवाला कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठीचा वार्षिक शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता. १६) साबू हॉल सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री प्रा. डॉ. गणपति यादव (नॅशनल सायन्स चेअर, सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड, भारत सरकार), हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर प्रवीण नाईक, डॉ. किरण कोलवणकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. यतींद्र राणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका बलजीत कौर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. मुख्य अतिथींचा परिचय आयक्यूएसी समन्वयक डॉ. भूषण आरेकर यांनी करून दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिमांशु दावडा यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. मुख्य अतिथी पद्मश्री प्रा. (डॉ.) गणपति यादव यांनी बारावी, पदवी, पदव्युत्तर, पीएचडीमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवले. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांची वर्गाबाहेरील भूमिका अधोरेखित केली व संवादात्मक शिक्षण पद्धतीचे महत्त्व पटवून दिले. याचबरोबर महिलांसाठी मोफत शिक्षणाची इच्छा त्यांनी व्यक्त केली. देश-विदेशात आपले कार्य सिद्ध करून महाविद्यालयाचा गौरव वाढवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. दीपा सुधीर, कुमुद तिवारी, संजय विस्पुते, लतिका भानुशाली आणि सुनीता नायर तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्षा देसाई, वर्षा साटम, बकुल बागवे, विजय शिंपी, नीता सिंह, संजयकुमार सिंह, प्रफुल्ल शेलार आणि सुनील सुतार यांचा आर. जे. महाविद्यालयातील पंचवीस वर्षांच्या समर्पित सेवेसाठी विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.