भिवंडीत विकास आराखड्यावरून पुन्हा वाद पेटला
विकास आराखड्यावरून पुन्हा वाद पेटला
आमदार अबू आझमी यांची आराखडा रद्द करण्याची मागणी
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : महापालिकेने जाहीर केलेल्या विकास आराखड्यामुळे शहराच्या विकासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या मते, हा आराखडा शहराच्या संपूर्ण विकासासाठी नाही, तर निवडक बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आला आहे. बिल्डर लॉबीला या आराखड्यात मोठा फायदा झाल्याचा आरोपही केला जात आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिक, व्यापारी आणि धार्मिक स्थळांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा प्रचंड रोष आहे. आमदार अबू आझमी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हा विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली आहे.
कल्याण रोडवरील ६,२२२ रहिवाशांनी या आराखड्याविरुद्ध लेखी आक्षेप नोंदवले होते. सुनावणीला १,४९८ लोक उपस्थित होते, पण त्यांचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. त्याउलट, बिल्डर लॉबीसाठी आरक्षित भूखंडांवर बदल केले गेले आणि ते लागूही करण्यात आले, असा आरोप आहे. महापालिकेने अनेक आरक्षणे बदलली आहेत. झीनत कंपाउंड (कणेरी) पार्किंग झोनचे निवासी झोनमध्ये रूपांतर, टेमघर येथील ट्रक टर्मिनल हटवून निवासी झोन आणि बस डेपो तयार करणे, रिलायन्स दांडेकर कंपनीच्या जमिनीवरील औद्योगिक झोन व्यावसायिक झोनमध्ये बदल, तसेच भादवड (एम५८) आणि गोदरेज प्रकल्पातील एसटीपी ग्रीन झोनमध्ये रूपांतर यांसारखे बदल करण्यात आले आहेत.
राजीव गांधी चौक ते व्हीपी नाका रस्त्याचे रुंदीकरण मर्यादित ठेवण्यात आले आहे, जेथे सरकारी कार्यालये, रुग्णालये आणि बस डेपो यांसाठी जागा राखून ठेवण्यात आली आहे. भिवंडीला मेट्रो प्रकल्प-५ ला जोडण्याची प्रक्रिया २०१६ मध्ये सुरू झाली होती. यादरम्यान अनेक घरमालक आणि दुकानदारांनी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे होणाऱ्या तोडफोडीचा धोका कळवला होता. २०२१ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिगत मेट्रोचा निर्णय घेतला, ज्याचे नागरिकांनी स्वागत केले; मात्र १२ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या नवीन डीपीमध्ये कल्याण रोडच्या दोन्ही बाजूंना २० फूट रस्ता रुंदीकरणाचा समावेश केल्यामुळे जनता आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये पुन्हा संताप वाढला आहे. हजारो आक्षेप नोंदवले तरी काहीही बदल झाला नाही. यामुळे आमदार अबू आझमी यांनी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.