सुसाईड डिसीजवर यशस्वी शस्त्रक्रिया
सुसाइड डिसीजवर यशस्वी शस्त्रक्रिया
ठाणे, ता. १७ : चेहऱ्यावरील तीव्र आणि असह्य वेदनांनी हैराण करणाऱ्या ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजारावर ठाण्यातील हायलँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. चंद्रनाथ तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. हा वेदनादायक आजार असून, तो ‘सुसाइड डिसीज’ म्हणूनही ओळखला जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
रायगड जिल्ह्यातील तबस्सुम हफीज या ४६ वर्षीय महिलेचा दोन वर्षांचा त्रास या उपचाराने संपला. सुरुवातीला तिला चेहऱ्याच्या उजव्या बाजूस दातदुखीसारख्या वेदना जाणवत होत्या. अनेक दंतचिकित्सकांचे सल्ले, रूट कॅनल उपचार आणि अक्कलदाढ काढल्यानंतरही त्रास कायम राहिल्याने अखेर मुंबईतील न्यूरोलॉजिस्ट डॉ. गिरीश सोनी यांच्या सल्ल्याने एमआरआय करण्यात आले. यात ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया असल्याचे निदान झाले. डॉ. सोनी यांनी तिला तातडीने ठाण्यातील हायलँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे पाठवले. १९ ऑगस्ट २०२५ रोजी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर केवळ आठवडाभरातच तबस्सुम हफीज यांना वेदनांपासून पूर्णत: मुक्ती मिळाली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर येथील नामदेव पाटील (वय ५३) या रिक्षाचालकालाही याच आजाराने ग्रासले होते. चेहऱ्याच्या उजव्या बाजूला येणाऱ्या तीव्र वेदनांमुळे त्यांना खाणे, पिणे, बोलणेही अशक्य झाले होते. दंतचिकित्सकांनी औषधे दिली, पण त्रास वाढतच गेला. अखेर एमआरआय तपासणीत मज्जातंतूंचे नुकसान आढळले आणि ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचे निदान झाले. १३ मे २०२५ रोजी त्यांच्यावरही हायलँड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.