मुंबई
बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन
बुद्धगया महाविहाराच्या
मुक्तीसाठी आंदोलन
मुंबई, ता. १७ : बुद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आझाद मैदानात आज जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी केले. बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेले महाविहार मुक्त करा आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्या, महाबोधी विहार कायदा १९४९ रद्द करा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.