न्यायमूर्तींवरील टिपण्णी हा न्यायसंस्थेवर हल्ला
न्यायमूर्तींवरील टिपण्णी
हा न्यायसंस्थेवर हल्ला
ॲड. ओझांविरोधात खटला भरण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : न्यायमूर्तींवर वैयक्तिक हल्ले करणे म्हणजे थेट न्यायसंस्थेवर हल्ला करण्यासारखे असल्याचे मत बुधवारी (ता. १७) उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या विशेषपीठाने नोंदवले. तसेच उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीविरुद्ध निंदनीय आणि बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयाला ॲड. नीलेश ओझा यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान खटला दाखल करण्याचे आदेश दिले.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी पत्रकार परिषदेदरम्यान उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीविरुद्ध निंदनीय आणि बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या विशेष पूर्णपीठाने वकील नीलेश ओझाविरुद्ध स्वतःहून अवमान कारवाई सुरू केली आहे.
विद्यमान न्यायमूर्तींच्या चारित्र्यावर टीका करण्याचे ओझा यांचे वर्तन निष्पक्ष आणि वाजवी टीकेच्या अधिकाराचा गैरवापर करणारे आहे. ओझा हे व्यवसायाने वकील आहेत आणि त्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान आहे. संभाव्य परिणामांचीही जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी केले वक्तव्य हे अनावधानाने झाल्याचे म्हटले आहे. तथापि, प्रथमदर्शनी ॲड. ओझा यांची विधाने कायदा आणि न्यायाच्या प्रक्रियेत अडथळा आणणारी आहेत. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीविरुद्ध केलेली अपमानास्पद विधाने न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात आणि न्यायमूर्तींच्या प्रामाणिकपणावरील जनतेचा विश्वास कमी करू शकतात, असेही मुख्य न्या. श्री चंद्रशेखर, न्या. महेश सोनक, न्या. रवींद्र घुगे, न्या. अजय गडकरी आणि न्या. बी. पी. कुलाबावाला पूर्णपीठाने निरीक्षण नोंदवले. उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना ओझा यांच्याविरोधात फौजदारी अवमान कारवाई करण्याचे आदेश दिले तर ओझा यांना त्यांच्याविरोधात ही कारवाई का करू नये, त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश देऊन सुनावणी १६ ऑक्टोबरला निश्चित केली. ओझासोबतच्या अन्य वकिलांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
---
भाषा निंदनीय, अपमानजनक
ओझा यांनी अर्जात वापरलेली भाषा, निंदनीय, अपमानजनक आणि बदनामीकारक आहे. अशाप्रकारे केलेले भाष्य सर्वसामान्यांच्या मनात न्यायालयावरील विश्वास कमी करू शकतो, ही टीका करण्यासाठी योग्य पद्धत नसल्याचेही पूर्णपीठाने अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.