शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप
शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप
डिजिटल मार्गदर्शनासाठी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
अलिबाग, ता. १७ (बातमीदार) : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘महाविस्तार ॲप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपमधून शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला, कीड व रोगाविषयी माहिती, खतांचा योग्य वापर, तसेच बाजारभावाची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. याशिवाय गावनिहाय अवजारे बँकेची माहिती, महाडीबीटी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सर्व योजना, आवश्यक कागदपत्रे व अर्जाची प्रक्रिया या ॲपवर समाविष्ट आहे. ऑनलाइन शेती शाळा आणि नव्या तंत्रज्ञानाचे व्हिडिओही शेतकऱ्यांना यात पाहता येणार आहे.
शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून शेतकरी आयडीने लॉगिन करावे. यातून ‘मला प्रश्न विचारा’ या पर्यायाद्वारे थेट आपले प्रश्न विचारून त्यांचे निराकरण करता येते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हे ॲप वापरून शेतीविषयक माहितीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सध्या रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपरिक एवजी आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. विविध यंत्राणा वापर आता शेतीसाठी केला जात आहे. त्यातच आता कृषी विभागाकडून महाविस्तार नावाने नवीन ॲप सुरू करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व महाडीबीटीवर असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अर्थात त्यातील विविध घटकाकरिता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती या ॲपमध्ये समाविष्ट आहे. ऑनलाइन शेतीशाळा, नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओदेखील या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बघू शकणार आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअर वरून महाविस्तार ॲप डाऊनलोड करून घ्यावा, त्यानंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉगईन करून आपले नाव, गाव, तालुका प्रविष्ठ करावयाचा आहे. जेणेकरून त्यांची गावनिहाय, तालुकानिहाय सर्व माहिती त्यांना उपलब्ध होईल.
................
शेतीसाठी उपयुक्त गोष्टी
ॲपच्या होम पेजवर शेतकऱ्यांना सर्व माहिती उपलब्ध होईल तसेच नवनवीन गोष्टीविषयी किंवा शेतकरी बांधवांच्या मनात येणाऱ्या शंका व त्यांचे विविध प्रश्न ॲपच्या माध्यमातून सोडवू शकतात. ॲपमधील मला प्रश्न विचारा, या विभागामध्ये जाऊन आपल्या शंकांचे निराकरण करण्यात येणार आहे. तसेच अगदी एका क्लिकवर शेतीसाठी लागणारी यंत्र, अवजारे भाडेतत्त्वावर मिळण्यास मदत होणार आहे. गावाच्या जवळपास असणाऱ्या अवजारे बँकांची माहितीदेखील या ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीविषयक एक सोबती, मित्र आता त्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
..............
कोट :
ॲपविषयीच्या अधिक माहितीकरीता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.
- वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.