शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान अधोरेखित

शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान अधोरेखित

Published on

शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान अधोरेखित
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे प्रतिपादन
वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभियंत्यांचे कौतुक करताना, नवी मुंबईसारख्या नियोजित शहराच्या विकासात अभियंत्यांचे योगदान सर्वाधिक असून बदलत्या तंत्रज्ञानाशी आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानकेंद्र येथे भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, तसेच नामांकित प्रेरणादायी वक्ते आनंद मुन्शी आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले की, कोणत्याही शहराची प्रगती अभियंत्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यामुळे होते. नवी मुंबई महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग लोकाभिमुख काम करणारा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी मागील वर्षभरात पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा आढावा घेत पुढील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी व्याख्याते आनंद मुन्शी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. काम आनंदाने, नवनवीन गोष्टी शिकत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून केले तर वैयक्तिक प्रगतीसोबत संस्थेलाही त्याचा फायदा होतो, असे सांगून त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जीवनशैलीतील बदलांचे महत्त्व पटवून दिले.
...............
अभियंत्यांचा गौरव
या कार्यक्रमात उल्लेखनीय प्रकल्प पूर्ण करणाऱ्या अभियंता समूहाचा सन्मान करण्यात आला. वाशी सेक्टर १२ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स प्रकल्प पूर्ण करणारे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, उपअभियंता जितेंद्र नाईक, सहायक अभियंता हेमंत घाडगे. सीबीडी बेलापूर सेक्टर १२ टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट मुदतपूर्व पूर्ण करणारे अभियंते अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता वसंत पडघन, उपअभियंता संतोष उनवणे, उपअभियंता स्वप्निल देसाई आणि सहायक अभियंता अभय गावित, विद्युत विभाग : ई-ऑफिस प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, उर्जाबचतीसाठी विशेष फिटींग्ज, शाळा आणि समाजमंदिरांत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमातून अभियंत्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रेरणा देण्याबरोबरच, आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com