अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती कार्यशाळेत बनविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद
अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती कार्यशाळेत बनविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद
सकाळ एनआयईचा उपक्रम
अलिबाग, ता. १८ (बातमीदार) : निसर्गाच्या सान्निध्यात सकाळ एनआयईच्या वतीने आयोजित किल्ला बनविणे कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या जवळचा कुलाबा किल्ला बनविण्याचा हट्ट धरला आणि मूर्तीकार प्रशिक्षक कैलास चोरघे यांनी अलिबागच्या समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या मदतीने बनविली.
तेव्हा विद्यार्थ्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला.
दिवाळीत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे काम म्हणजे किल्ला बनवणे. दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले मोठ्या उत्साहात मातीपासून किल्ला तयार करत असतात. या कलेला चालना देण्यासाठी सकाळ एनआयईच्या वतीने किल्ला बांधणे कार्यशाळेचे गुरुवारी (ता. १८) आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. हर्षल मोरे, शाळेचे मुख्याध्यापक राजन गायकवाड, प्रमिला म्हात्रे, सायली पाटील, अनघा पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
सकाळ एनआयईमुळे मुलांच्या मनावर चांगले संस्कार
दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. आम्ही लहान होतो तेव्हा शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, त्या दिवसांपासूनच आपण किल्ला कसा बनवायचा? नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र डोक्यात फिरू लागायचं. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जाच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे. सकाळ एनआयईमुळे मुलांच्या मनावर चांगले संस्कार होत आहेत, असे हर्षल मोरे यांनी म्हंटले आहे.
किल्ला बनवण्यामागील ऐतिहासिक कारणे
थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंद-दुखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो. तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात. ते असं सांगतात, पुर्वीच्या काळात दळण-वळणाची साधनं नव्हती. त्यामुळे गावातील काही ठराविक लोकच गड-किल्ले पाहायला जात होते. मग, ते तिथून आल्यावर लहान मुलांना त्या किल्ल्याचा इतिहास सांगत होते. त्यात किल्ल्याची बांधकाम शैली, त्यावर असणारे बुरुज त्याची माहिती गोष्टीच्या रुपात सांगायचे. मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत, असे राजन गायकवाड यांनी सांगितले.
फोटो ओळ : अलिबाग नगर परिषद शाळा कोळीवाडा येथे किल्ला बनविण्याच्या कार्यशाळेत मुर्तीकार प्रशिक्षक कैलास चोरघे सोबत विद्यार्थी व शिक्षक
फोटो फाईल नाव : alkoliwada
-----------------------------------समाप्त------------------------------फोटो-------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.