उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा!

उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा!

Published on

उत्सव गणरायाचा, जागर पर्यावरणाचा!
पनवेल महापालिकेकडून तब्बल ४४ टन निर्माल्य संकलन
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : गणेशोत्सव म्हणजे उत्साह, श्रद्धा आणि भक्तीचा संगम. मात्र यासोबतच पर्यावरणपूरकतेची जाणीव ठेवत पनवेल महापालिकेने यावर्षी “उत्सव गणरायाचा – जागर पर्यावरणाचा” हा उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार राबविलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा दिवसांच्या उत्सवकाळात तब्बल ४३.९८ टन (४३,९८० किलो) निर्माल्य संकलन करण्यात यश आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी यंदाही महापालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. विसर्जन स्थळांवर मूर्तींसह येणारे हार, फुले, दुर्वा, शमी यांसारखे निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र कलशांची सोय करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. महापालिकेने निर्माल्य नैसर्गिक वा कृत्रिम तलावात टाकण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे चार विशेष निर्माल्य संकलन रथांच्या माध्यमातून दररोज घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील निर्माल्य जमा करण्यात आले.
..................
पर्यावरणपूरक प्रक्रिया
संकलित निर्माल्याची विल्हेवाट लावताना महापालिकेने पर्यावरणपूरक पद्धती अवलंबली. या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करून ते महापालिकेच्या बागा व उद्यानांतील झाडांसाठी वापरले जाणार आहे. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने ७,८६५ किलो निर्माल्याचे संकलन करून त्यावरही स्वतंत्र प्रक्रिया करण्याचे काम हाती घेतले आहे.
........................
कोट
पालिकेने आवाहन केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संकलित निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर केले जात आहे. धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणे हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
- डॉ. वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका
...........
प्रभागनिहाय निर्माल्य संकलन
कळंबोली – १६,०४५ किलो
खारघर – १२,००५ किलो
कामोठे – ९,२६० किलो
पनवेल शहर – ४,४२५ किलो
नावडे उपविभाग – २,२४५ किलो
एकूण – ४३,९८० किलो निर्माल्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com