राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

Published on

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

घटस्थापनेला मुंबईत प्रदान साेहळा; मुंबई विभागातील आठ जणांचा समावेश


मुंबई, ता. १८ : शालेय शिक्षण विभागाने रखडलेल्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणवगौरव पुरस्कार आज जाहीर केले. राज्यातील शाळांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या १०९ शिक्षकांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणवगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मुंबई विभागातील आठ शिक्षकांचा समावेश आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर २२ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पुरस्कार प्रदान साेहळा पार पडणार आहे. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मंत्री, शिक्षक आमदार आदी उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांत प्राथमिक शाळेतील ३८, माध्यमिक ३९, आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक प्राथमिक शाळांतील १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका आठ, तसेच विशेषमध्ये कला-क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षकांपैकी एक आणि स्काऊट गाइडमधील दोन शिक्षकांचा समावेश आहे. मुंबईतील एकूण आठ शिक्षकांचा समावेश असून यात प्राथमिकच्या तीन, माध्यमिकच्या चार आणि ‍आदर्श शिक्षिकांमध्ये एका शिक्षिकेने हा पुरस्कार पटकावला आहे. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिकच्या प्रत्येकी दोन शिक्षक तर उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येक एका शिक्षकांची निवड झाली आहे. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये ठाणे, नंदुरबार, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तर उर्वरित जिल्ह्यातील प्रत्येक एका शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
--
मुंबई विभागातील पुरस्कार विजेते
प्राथमिक
संतोष यादव (एमएसपी देवनार कॉलनी महापालिका शाळा, गोवंडी)
दुर्गाप्रसाद हटवार (संत कक्कय्या मार्ग मनपा हिंदी शाळा, धारावी)
संध्या सावंत (बालविकास विद्या मंदिर, जोगेश्वरी)
तृप्ती पेन्सलवार (जि.प. शाळा, देवळोली, अंबरनाथ)
उमेश खिराडे (जि.प. शाळा, पाली, केंद्र पोशेरी, वाडा)
मानसी भोसले (जि.प. शाळा, सांगुर्ली, ता. पनवेल)
--
माध्यमिक
- योग‍िनी पोतदार (विद्याभवन हायस्कूल, घाटकोपर)
- जगदीश इंदलकर (दि न्यू सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी शाळा, सायन)
- सुदाम कटारे (नूतन विद्यामंदिर, मालाड)
- भाऊसाहेब घाडगे (सरस्वती विद्यालय, कांजूर व्ह‍िलेज)
- खालेदा खोंडेकर (मोमीन गर्ल्स हायस्कूल, भिवंडी)
- महादेव इरकर (रघुनाथ पाटील उत्कर्ष महाविद्यालय, पालघर)
--
आदिवासी क्षेत्रातील शिक्षक
रवींद्र भोईर (जि.प. शाळा कुंडणपाडा, शहापूर)
सतीश घावट (जि.प. उच्च प्रा. शाळा झुगेरवाडी, कर्जत)
आनंदा आनेमवाड (जि.प.शाळा महालपाडा पोस्ट गंजाड, पालघर)

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्ष‍िका
अपूर्वा जंगम (जि.प. शाळा, कशेणे पोस्ट, तळाशेत, रायगड)
----
एकूण १०९ : पुरस्कार, प्राथमिक-३८, माध्यमिक-३९,
आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक-१९, आदर्श शिक्षिका-आठ
विशेष-दोन, दिव्यांग-एक, स्काऊट गाईड-दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com