मुंबईतील रस्ते डिसेंबरपर्यंत पूर्ण करा
मुंबईतील रस्ते डिसेंबरपर्यंत पूर्ण करा
पालिका आयुक्तांना विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई महापालिकेला रस्त्यांची अपूर्ण कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, स्थानिकांच्या मागणीशिवाय आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा न करता कोणतेही रस्ते खोदले जाऊ नयेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.
शहरातील रस्ते विकास जलदगतीने करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी (ता. १९) पालिकेला अर्धवट रस्त्यांची कामे ऑक्टाेरपासून सुरू करण्याचे निर्देश दिले. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या विनंतीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिकांच्या आग्रहाशिवाय आणि संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतरच नवीन रस्ते खोदकाम केले जाईल. तसेच पदपथावर पेव्हरब्लॉकचा वापर न करता टिकाऊपणासाठी ते काँक्रीटने बांधण्याचे निर्देशही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले.
रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करताना आमदार अमित साटम म्हणाले, की निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांबद्दलच्या सर्व तक्रारी तांत्रिक मूल्यांकनासाठी आयआयटीकडे पाठवण्याचे आणि त्यांच्या सूचनेनुसार दुरुस्त करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले आहेत.
आता विभागनिहाय डॅशबोर्ड
आतापर्यंत एकूण रस्त्यांच्या कामांपैकी ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. अधिक पारदर्शकता आणण्यासाठी पालिका आता रस्ते विकासाच्या प्रगतीचा मागोवा लोकांना घेता यावा, यासाठी विभागनिहाय डॅशबोर्ड तयार करणार आहे, असेही आमदार अमित साटम यांनी सांगितले.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.