नवरात्र उत्सव शांततेसह सुरक्षिततेत साजरा करा

नवरात्र उत्सव शांततेसह सुरक्षिततेत साजरा करा

Published on

नवरात्रोत्सव शांततेसह सुरक्षिततेत साजरा करा
महिलांनी मौल्यवान वस्तूंची दक्षता घ्यावी; पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांचे आवाहन
खोपोली, ता. २० (वार्ताहर) : नवरात्रोत्सव हा धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण असून तो सर्वत्र उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो; मात्र या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे व खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस पाटील तसेच नवरात्रोत्सव मंडळांचे आयोजक सहभागी झाले होते.
बैठकीत उत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. शासनाच्या परिपत्रकानुसार उत्सव साजरा करणे बंधनकारक असून, ध्वनिप्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे आयोजकांना सांगण्यात आले. आवाजाची मर्यादा किती असावी, ध्वनिक्षेपक वापरण्याच्या वेळा आणि डीजे, डॉल्बीवरील संपूर्ण बंदी यासंबंधी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नवरात्र मंडळांनी परवानगीसाठी ‘आपले सरकार’चा वापर करावा, तसेच देवीमूर्तींच्या सुरक्षेसाठी २४ तास स्वयंसेवक नेमून मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचना पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली. विद्युत पुरवठा कायदेशीर मीटरमधूनच घ्यावा व जोडणी व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल, असे बॅनर, देखावे किंवा चित्रफिती टाळाव्यात, असे आवाहनही करण्यात आले. गरबा व दांडिया कार्यक्रम रस्त्यावर खेळू नयेत, तसेच आक्षेपार्ह अथवा अश्लील गाणी वाजवू नयेत, वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी विशेष सूचना दिल्या. गरबा व दांडियास्थळी छेडछाड किंवा विनयभंगाच्या घटना घडल्यास तत्काळ कारवाई होईल, असे निरीक्षक सचिन हिरे यांनी स्पष्ट केले.

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवावी, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करावी, तसेच ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमाचे पालन करून योग्य वेळी मिरवणूक पूर्ण करावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

चौकट

पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले, की नवरात्रोत्सव हा खऱ्या अर्थाने महिलांच्या आनंदाचा सण आहे. त्यामुळे महिला भगिनींनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तरुणींना कोणीही त्रास दिल्यास त्याची गय केली जाणार नाही आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच समाजात सलोखा राखून, प्रशासनाच्या नियमांचे पालन करून उत्सवाचा आनंद लुटावा, असे त्यांनी स्पष्टपणे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com