नवरात्रात कन्या पूजनासाठी बाजारपेठेत भेटवस्तूंचा साज

नवरात्रात कन्या पूजनासाठी बाजारपेठेत भेटवस्तूंचा साज

Published on

नवरात्रात कन्या पूजनासाठी बाजारपेठेत भेटवस्तूंचा साज
२ ते १० वर्षे वयोगटातील मुली, आकर्षक, यूजफुल गिफ्ट्ससाठी भाविक गर्दी
ठाणे, ता. २० (बातमीदार) : नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते. यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्या पूजा केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या अनुषंगाने ठाण्यातील बाजारपेठेत विविध शैक्षणिक, खेळ, खाद्य पदार्थ, कानातले, मोत्याच्या माळी, हेयर क्लिप, हेयर बँड, रुमाल, मेकअप किट इत्यादी भेटवस्तू कन्या पूजनासाठी उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, या आकर्षक वस्तूंच्या खरेदीसाठी भाविक गर्दी करीत आहेत.
येत्या २२ सप्टेंबर रोजी नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा केली जाते. नवदुर्गांच्या पूजेबरोबरच या नऊ दिवसांत कन्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते, अशी धार्मिक धारणा आहे. यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून, ३० सप्टेंबर रोजीच महाअष्टमी आणि १ ऑक्टोबर रोजी महानवमी तिथी आहे. या पार्श्वभूमीवर बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीत व्यस्त आहेत. अनेक जण आपल्या घरी हमखास कन्या पूजन करतात. कन्या पूजेमध्ये दोन ते १० वर्षे वयोगटातील मुलींना घरी बोलावून कन्या पूजा केली जाते.
मुली देवीचं रूप असल्याचं म्हटलं जातं, म्हणूनच त्यांची पूजा करून त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. पण मुलींना नेमक्या काय भेटवस्तू द्यायच्या, असा नेहमीच स्त्रियांना प्रश्न पडतो. दरम्यान, सध्या ठाणे बाजारपेठ विविध भेट वस्तूंनी सजली असून, त्यात छान छान गोष्टींची पुस्तकं, भन्नाट पझल्स, पेन्सिल, पेन, चित्रकलेची वही, रंगीत खडू, पेन्सिल बॉक्स, खाद्य पदार्थ, कानातले, मोत्याच्या माळा, हेयर क्लिप, हेयर बँड, रुमाल, मेकअप किट इत्यादी आकर्षक आणि सुंदर भेटवस्तू कन्या पूजनासाठी उपलब्ध आहेत.

उपलब्ध भेटवस्तूंच्या किमती
ब्रेस्लेट - ₹ १२० डझन
हेयर बँड - ₹ ६० ते ₹ ४८० डझन
फॅन्सी मोत्यांच्या माळी - ₹ ३० नग
हेयर डिझायनर टिकटॉक क्लिप - ₹ ३० ते ₹ ६० पॅकेट
कानातले - ₹ १०० पासून सुरू (डझन)
फॅन्सी आरसा - ₹ २००(डझन)
गोष्टी व चित्रकला पुस्तकं - ₹ ५० ते ₹ १००
भन्नाट पझल्स - ₹ ३०० पासून सुरू
पेन्सिल बॉक्स - ₹ १०० पासून सुरू
मेकअप किट - ₹ २०० पासून सुरू
रुमाल - ₹ १०० (डझन)

शृंगारातील वस्तूंकडे ओढ
नवरात्री उत्सवात कन्या पूजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. याच अनुषंगाने यंदा कन्या पूजनासाठी बाजारात विविध प्रकारचे नवनवीन साहित्य उपलब्ध झाले आहे. या आकर्षक भेटवस्तूंनी भाविकांचे लक्ष वेधले असून, या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत. यंदा मुलींसाठी साजशृंगारातील वस्तूंकडे नागरिकांची जास्त ओढ असल्याचे विक्रेते स्वप्नील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com