जागतिक श्वानदंश जनजागृती वाकेथॉन व चर्चासत्र

जागतिक श्वानदंश जनजागृती वाकेथॉन व चर्चासत्र

Published on

कल्याणमध्ये श्वानदंश जनजागृती वॉकेथॉन
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : जागतिक अँटी-रेबीज दिन रविवारी (ता. २८) साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि व्हेटरनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने जागतिक श्वानदंश जनजागृती वॉकेथॉन व चर्चासत्राचे आयोजन केले होते. डोंबिवली परिसरात ७ ते १३ सप्टेंबर या कालावधीत भटके श्वान व मांजरांसाठी मोफत अँटी-रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत एकूण १,७५२ भटके कुत्रे आणि ७७ भटक्या मांजरांना एकूण १,८२९ प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले.

शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजता वंदे मातरम उद्यान (मिलापनगर, एमआयडीसी निवासी भाग) येथून वॉकेथॉनची सुरुवात झाली. एमआयडीसीमधील प्रमुख रस्त्यांवरून वॉकेथॉन निघून शिवप्रतिमा मित्र मंडळ सभागृहात त्याचा समारोप झाला. या वॉकेथॉनमध्ये शाळा- कॉलेज विद्यार्थी, रोटरीयन, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या महिला, निवासी परिसरातील नागरिक आणि प्राणीप्रेमी उपस्थित होते. सकाळी साडेनऊ ते साडेअकरादरम्यान शिवप्रतिमा मित्र मंडळ सभागृहात श्वानदंशविषयक चर्चासत्र आयोजित केले. या वेळी या उपक्रमात सहभागी आणि सहाय्य करणाऱ्या संस्था, प्राणीप्रेमी, नागरिक यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीयन डॉ. नीलेश जयवंत (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट), विशेष अतिथी विद्याधर भुस्कुटे, तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष अनिल कुमार हिरावत, सेक्रेटरी अभिषेक सोनार आणि या उपक्रमाचे १४ वर्षांपासून प्रेरक रोटरीयन व प्रकल्प प्रमुख डॉ. मनोहर अकोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन डॉ. मकरंद गणपुले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com