नवचैतन्यासाठी देवीची आराधना
प्रसाद जोशी, वसई
आदिशक्तीचे रूप असणाऱ्या देवीची नऊ दिवस आराधना, तसेच गरबा, दांडिया खेळासाठी वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहरातील नागरिक उत्साही झाले आहेत. सोमवार (ता. २२)पासून सुरू होणार्या नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहेत. देवीच्या मूर्ती मंडपात आणल्या जात आहेत. आता पुढील नऊ दिवस नवचैतन्यात भाविकवर्ग न्हाऊन निघणार आहे.
दुर्गादेवीला शक्तीचे रुप मानले जाते. नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची आराधना केली जाते. उपवास केला जातो. महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण असते. वसई-विरार मिरा-भाईंदर शहरात असणाऱ्या सार्वजनिक मंडळांत देवीची मूर्ती आणून सामाजिक एकोपा जपला जाणार आहे, तर घरीदेखील घटस्थापना केली जाणार आहे. देवीच्या मंदिरांत नऊ दिवस कीर्तन, प्रवचन, होम-हवन, भजन, ताळ-मृदंगाचा आवाज निनादणार आहे. याचा आनंद घेण्यासाठी भाविकांची पावले मंदिराकडे वळणार आहेत. सोमवारी होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पूजा-अर्चा आणि गरबा अशी सांगड नऊ दिवस अनुभवयास मिळणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायद्याचे पालन व्हावे, सार्वजनिक ठिकाणी शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळले, तर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असे सांगण्यात आले.
वसई-विरार मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी ११२ व पाच हजार २७१ घरगुती घटस्थापना करण्यात येणार आहेत. एकूण दोन हजार १३ ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळण्यासाठी तरुणाईपासून ज्येष्ठापर्यंत नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा असणार आहे.
मंदिरात गर्दी होणार
नऊ देवीचे दर्शन एकाच वेळी घेता यावे, म्हणून बस बुक करण्यात आल्या आहेत. काही खासगी वाहनाने महिला देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. विरारमध्ये जीवदानी देवी, नायगाव येथील चंडिका माता, नालासोपारा परिसरातील उमादेवी, तुळजाभवानी, महाकाली यासह विविध भागात असणाऱ्या मंदिरात नागरिकांची गर्दी होणार आहे.
मिरा-भाईंदर वसईविरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील मूर्ती
सार्वजनिक ७१४
घरगुती १९ती
गरबा, दांडियाचे आयोजन
परिमंडळ १ ४४८
परिमंडळ २ ३८९
परिमंडळ ३ १,२१३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.