एपीएमसी मार्केटमध्ये सर्रास गुटखाविक्री

एपीएमसी मार्केटमध्ये सर्रास गुटखाविक्री

Published on

एपीएमसी मार्केटमध्ये सर्रास गुटखाविक्री
अन्न-औषध प्रशासनसह पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जण अटकेत, गुटखा जप्त
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये बुधवारी अन्न-औषध प्रशासन आणि एपीएमसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बाजार परिसरात पानटपऱ्यांवर खुले आम गुटखा, नशीले पदार्थ आणि दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम राबविण्यात आली.
यापूर्वीही अनेक टपऱ्यांवर छापे टाकून त्या सील करण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोर्टात अपूर्ण माहिती दिल्याने काही दिवसांतच त्या पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे गुटखा माफियांचा धंदा पूर्ववत सुरू असल्याचे चित्र आहे. बाजार आवारात एकूण १३० पानटपऱ्या असून, त्यापैकी जवळपास १०० टपऱ्यांवर गुटखा विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. या टपऱ्यांवर तरुण कामगार पाणी, बिस्कीट विक्रीच्या आडून गुटखा पुरवतात. विशेष म्हणजे या अवैध धंद्यासाठी दरमहिन्याला लाखो रुपयांची वसुली केली जाते. हे पैसे बाजार समितीतील काही अधिकाऱ्यांकडेच पोहोचतात, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. बाजार समितीचे सचिव, सुरक्षा अधिकारी तसेच अन्न-औषध प्रशासनातील काही अधिकारी यांच्याच संगनमताने हा धंदा सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे. एपीएमसी पोलिस आणि अन्न-औषध प्रशासन वारंवार पत्रव्यवहार करूनही सचिवांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे सहाय्यक आयुक्त योगेश धाणे यांनी स्पष्ट केले.
...........
बाजार आवारात तब्बल पाच हजार कामगार अवैधपणे वास्तव्यास आहेत. हेच कामगार गुटखाविक्रीसाठी मुख्य आधार ठरत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे नशामुक्त बाजार समितीचा उपक्रम फोल ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा, गांजा आणि दारूविक्री उघडपणे सुरू असून, कारवाईनंतर पुन्हा टपऱ्या सुरू होतात. एका पानटपरीचे भाडे २० ते ३० हजार रुपये घेतले जात असताना एपीएमसी प्रशासनाला फक्त १, ५०० रुपये महसूल मिळतो. त्यामुळे प्रशासनच या बेकायदा व्यवसायाला अप्रत्यक्ष संरक्षण देत असल्याचा आरोप होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com