भिवंडीचा कार्तिक हणमंत कुंभार यांचा ऐतिहासिक पराक्रम
भिवंडीचा कार्तिक कुंभार यांचा ऐतिहासिक पराक्रम
बुद्धिबळ स्पर्धेत दोन हजार मार्क ओलांडून ग्रँडमास्टरवर विजय
भिवंडी, ता.२० (बातमीदार) : भिवंडीत शालेय जीवनापासून बुध्दिबळाला आपल्या जीवनाचे लक्ष बनवित कार्तिक कुंभार यांनी भिवंडी शहरापासून राज्यस्पर्धा व राष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवीत विविध स्पर्धा जिंकत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील विक्रम करत आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी २७५ फिडे गुणांची झेप घेत ग्रँडमास्टरवर विजय मिळविला आणि सात वर्षांनंतर त्यांनी युरोपातील स्पेनमध्ये आपले स्वप्न पूर्ण केले
युरोपातील स्पेन देशातील बार्सिलोना शहरात जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील सहा स्पर्धांत त्यांनी सहभाग घेतला. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स, स्पेन अशा २०-३० बलाढ्य देशांतील स्पर्धेमध्ये खेळाडूंना पराभूत करत कार्तिक यांनी तब्बल २७५ फिडे रेटिंग गुणांची वाढ केली. दोन महिन्यापूर्वी १७४५ वरून थेट २०२० रेटिंगपर्यंत पोहोचत त्यांनी २००० मार्क ओलांडण्याचे आपले स्वप्न साकार केले.कार्तिक कुंभार यांनी प्रथम २०१८ मध्ये आपले पहिले रेटिंग मिळविले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षे शेकडो स्पर्धा खेळत, भारतभर प्रवास करत आणि युरोपमधील पहिल्याच दौऱ्यात त्यांनी फिडे रेटिंगची प्रत्यक्षात वाढ केली.
देशासाठी खेळण्याची प्रेरणा मिळाली ः कुंभार
बुद्धिबळात ग्रँडमास्टर ही सर्वात उच्च पदवी असते. युरोप प्रवासातील सुवर्णक्षण म्हणजे स्पेनमधील एका ग्रँडमास्टरवर मिळवलेला विजय होय. त्यामुळे १७४५ रेटिंगवरून थेट ग्रँडमास्टरवर मात करणे हे अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक यश ठरले आहेत, अशी माहिती कार्तिक कुंभार यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले कि, पहिल्यांदाच मी भारताबाहेर खेळत होतो. माझ्या नावासमोर भारतीय ध्वज झळकत होता. तो ध्वज पाहून मला देशासाठी खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि विजयाची ताकद मिळाली.
२५० युरो इतकी पारितोषिक रक्कम
या स्पर्धांतून कार्तिक यांनी एकूण २५० युरो इतकी पारितोषिक रक्कम देखील जिंकली. विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी त्यांना ऑल इंडिया चेस फेडरेशन व महाराष्ट्र चेस असोसिएशन यांचे औपचारिक निमंत्रण व सहकार्य लाभले आहे.
वडील पालिकाचे मुख्याध्यापक
कार्तिक कुंभार यांची आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. भिवंडी शहरातील बी.ई. (मेकॅनिकल) पदवीधर व व्यावसायिक फिडे रेटेड बुद्धिबळपटू कार्तिक हणमंत कुंभार, यांचे वडील सध्या भिवंडी पालिका शाळा क्र. १९ चे मुख्याध्यापक आहेत. विविध संकटांवर मात करीत कार्तिक यांनी पहिल्याच परदेश दौऱ्यात ऐतिहासिक यश संपादन केल्याने शहरातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.