हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशी गर्दी वाढतेय.

हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशी गर्दी वाढतेय.

Published on

प्रवासात सहनशक्तीचा अंत
हार्बर, ट्रान्स हार्बरवर गर्दीमुळे हाणामारीचे प्रकार
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबईतून जाणाऱ्या हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. बसायला जागा मिळत नसल्याने भांडणाचे रूपांतर हाणामारीत होत असल्याने रेल्वे प्रवास अनेकांना नकोसा झाला आहे.
पनवेल, उलवे, उरण भागात सध्या मोठी प्रमाणात गृहसंकुले उभारली जात आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कामानिमित मुंबई आणि उपनगरांमध्ये ये-जा करणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे ठाणे-पनवेल, ठाणे-वाशी हार्बर मार्गावर आणि नव्याने सुरू झालेल्या नेरूळ-उरण ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिसत आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान बसायलाही जागा नसल्याने संपूर्ण प्रवास उभ्याने करावा लागत आहेत. तर कार्यालयीन वेळेत प्रवाशांना गाडीत चढताही येत नाही. अशीच परिस्थिती ठाणे-पनवेल प्रवासादरम्यान आहे.
-------------------------------------
वादविवादाचे प्रकार
सानपाडा रेल्वेस्थानकात पुरुष डब्यात बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने हाणामारी झाली. अखेर शेजारी बसलेल्या इतर प्रवाशांनी हस्तक्षेप केल्याने वाद नियंत्रणात आला. असाच काहीसा प्रकार ठाणे-वाशीदरम्यान ट्रेनमध्ये झाल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे पश्चिम, मध्य रेल्वेप्रमाणेच हार्बर मार्गावरील वाढलेली गर्दी वादविवादांना निमित्त ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
-------------------------------------------
गर्दी वाढण्याची कारणे
- नेरूळ रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हॉस्पिटल, महाविद्यालयामध्ये उपचार, शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच स्थानकातून नेरूळ-उरण ही ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे धावते; पण केवळ अकरा फेऱ्या होत आहेत.
- ऐरोली, महापे, कोपरखैरणेतील आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्या कामगारांमुळे रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत येथे प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे बसण्यावरून किंवा लोकलमध्ये चढण्यावरून होणारे वाद हिंसक स्वरूप घेऊ लागले आहेत.
- उलवे परिसरात बांधकाम होत आहेत. विविध गृहसंकुले येथे उभी राहत आहेत. परिणामी, रेल्वेवरील प्रवासी संख्या वाढली आहे. या मार्गावर सकाळ-संध्याकाळी पाय ठेवायला जागा उरत नाही. शिवाय, दोन फेऱ्यांमध्ये पाऊण तासांचे अंतर असल्याने गर्दी वाढते.
-------------------------------------
नेरूळ येथून उलवे जाताना विविध अडचणी उद्भवतात. एक रेल्वे चुकली तर दुसऱ्या रेल्वेसाठी पाऊण तास वाट बघावी लागते. शिवाय, कार्यालयीन वेळेत उभे राहायला जागा मिळत नाही, त्यामुळे किमान कार्यालयीन वेळेमध्ये फेऱ्या वाढवण्याची गरज आहे.
- द्रौपदी झरेकर, प्रवासी
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः-----------------------------------
ठाणे-पनवेल, ठाणे-वाशी हार्बर मार्ग तसेच नेरूळ-उरण ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. या प्रवासात बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे पूर्ण प्रवास उभ्याने करावा लागत असल्याने वाढलेली गर्दी नकोशी वाटते.
- दिव्यांजली देशमुख, महाविद्यालयीन युवती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com