दिघ्यातील दहशतीचा बिमोड

दिघ्यातील दहशतीचा बिमोड

Published on

दिघ्यातील दहशतीचा बीमोड
शांताबाई करंडेकर टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : शांताबाई करंडेकर टोळीने हत्या, हत्येचा प्रयत्न, मारामाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमुळे दिघा परिसरात दहशत निर्माण केली होती. तसेच अमली पदार्थांच्या विक्रीतून निर्माण केलेल्या दहशतीचे मकोकाअंतर्गत कारवाई करून बीमोड केला आहे.
टोळीप्रमुख शांताबाई किसन करंडेकर, तिचे साथीदार उषा नाईक, शैलेश नाईक ऊर्फ पिल्लू, ज्योती नाईक, नीलेश नाईक आणि रोशन बसन्ना नाईक यांनी एकत्र येऊन अमली पदार्थविक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणावर चालवत होते. सात-आठ वर्षांपासून दिघा, ऐरोली परिसरात टोळीने दहशत निर्माण केली होती. स्थानिक नागरिक त्यांच्या विरोधात तक्रार करायलाही घाबरत होते. या टोळीच्या कारवायांवर पोलिसांनी वारंवार छापे टाकले, मात्र पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घराभोवती व परिसरातील रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले होते. शिवाय परिसरात खबऱ्यांचे जाळे निर्माण करताना अमली पदार्थांची विक्री करत होते.
---------------------------------------------
गुन्हेगाराची विशिष्ट कार्यपद्धती
- दिघा रेल्वेस्थानकपासून थेट रिक्षाने टोळीच्या इमारतीपर्यंत जाऊन अचानक छापा टाकला. ५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. या वेळी पोलिसांनी टोळीच्या घरांची झडती घेऊन तब्बल ७५ लाखांचे एमडी जप्त केले होते.
- टोळीप्रमुख शांताबाई करंडेकर कळव्यातील फरार पुरवठादार सचिन कणसे ऊर्फ काका यांच्याकडून एमडी, गांजा विकत घेत होते. त्यानंतर नाईक कुटुंबीय हस्तकांमार्फत परिसरात अमली पदार्थांची विक्री करत होते. त्यासाठी टोळीने पाच ते सहा गुगल पे नंबर ठेवले होते. व्यवहार झाल्यानंतर खरेदीदारांना नंबर देऊन त्यावरून ऑनलाइन पैसे स्वीकारले जात होते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः-------------------------------
नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा भाग म्हणून अमली पदार्थाची खरेदी-विक्री, सेवनाविरोधात तसेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या संघटित गुन्हेगारीविरुद्ध ठोस पावले उचलत आहोत. याच अनुषंगाने शांताबाई करंडेकर टोळीवर मकोका गुन्हा दाखल केला आहे.
- संदीप निगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com