सणासुदीच्या तोंडावर वेलचीचे भाव गगनाला

सणासुदीच्या तोंडावर वेलचीचे भाव गगनाला

Published on

सणासुदीच्या तोंडावर वेलचीचे भाव गगनाला
किरकोळ बाजारात २५ ते ६० रुपये तोळा

वाशी, ता. २२ (बातमीदार) : सणासुदीच्या काळात चहा, दूध, मिठाई, फराळ, बिर्याणी, आणि इतर मसालेदार पदार्थांमध्ये अत्यावश्यक समजली जाणारी वेलची आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. किरकोळ बाजारात वेलचीचे भाव २५ ते ६० रुपये तोळ्यापर्यंत पोहोचले असून, घाऊक बाजारत याचे भाव १,४०० ते २,३०० रुपये किलो इतके गगनाला भिडले आहेत.

पूर्वी केरळ, तमिळनाडू, सिक्कीम या राज्यांत वेलचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत होते, मात्र अलीकडच्या काळात झारखंड, ओडिशा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्येही वेलचीची लागवड वाढली आहे. तरीही वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव वाढले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (एमपीएमसी, वाशी) गुरुवारी (ता.१८) सात टन ४८०० किलो वेलची आली होती. साधारणतः रोज पाच ते सात टन वेलचीची आवक बाजारात होते. या व्यापारातून दररोज दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.

सणासुदीचा परिणाम
दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर वेलचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. फराळ, मिठाई, आणि पक्वान्नांमध्ये तिचा वापर होतो. त्यामुळे घराघरात वेलची आवश्यक ठरते. परिणामी मागणी वाढल्यामुळे भाव आणखी चढे झाले आहेत.

वेलचीचे प्रकार
हिरवी वेलची : चहा, दूध, मिठाई यामध्ये वापरली जाते.
काळी वेलची : बिर्याणी, गरम मसाला आणि मसालेदार पदार्थांमध्ये अधिक वापरली जाते.

आरोग्यदायी फायदे
वेलची फक्त चव वाढवण्यासाठी नाही, तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. तिच्या उपयोगामुळे
पचनक्रिया सुधारते.
तोंडाच्या दुर्गंधीवर नियंत्रण ठेवले जाते.
हृदयाचे कार्य सुधारते.
मधुमेह नियंत्रणात राहतो.
शरीरातील सूज व दाह कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com