रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवघटी बसले
रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवघटी बसले
ब्रिटिश काळापासून सुरू असलेली पोलिस मानवंदना परंपरा कायम
रोहा, ता. २२ (बातमीदार) ः रायगडवासीयांचे श्रद्धास्थान आणि रोहा शहराचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांची सोमवार (ता. २२) रोजी विधिवत देवघटी बसविण्यात आली. या मंगलमय सोहळ्याने नवरात्रोत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. विशेष म्हणजे, ब्रिटिश काळापासून पोलिस मानवंदना देण्याची परंपरा जपणाऱ्या देशातील फक्त दोन देवस्थानांपैकी एक म्हणून धावीर महाराज देवस्थानाचे वैशिष्ट्य आजही कायम आहे.
शहराच्या पश्चिमेकडील हनुमान टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या भव्य मंदिरात श्री धावीर महाराजांसह कालिका माता, बहिरीबुवा, वाघबाप्पा व तीन वीरांची मूर्ती आहे. मंदिराबाहेर महाराजांचे अंगरक्षक मानले जाणारे ‘चेडा देव’ यांचे स्थान आहे. सोमवारी झालेल्या देवघटी सोहळ्यासाठी रोहा आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. गोंधळ्यांची आरती, विविध वाद्यांचा गजर आणि घंटानादामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांच्या जय धावीर महाराज, घोषणांनी वातावरण मंगलमय झाले.
देवघटी बसविताना पुजारी वालेकर यांनी महाराजांना प्रार्थना अर्पण केली. ग्रामस्थांच्या हातून हा उत्सव पारंपरिक पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडावा, काही त्रुटी झाल्या तरी महाराजांनी त्या गोड मानाव्यात आणि गावाला संकटांपासून दूर ठेवावे, अशी भावनिक गाऱ्हाणी त्यांनी सादर केली. त्यानंतर अक्षतांची उधळण करत नवरात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. ट्रस्ट अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समिती अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, तसेच विश्वस्त व पदाधिकारी मंडळींनीही कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.