जीएसटी दरकपातीने ‘बचत उत्सव’

जीएसटी दरकपातीने ‘बचत उत्सव’

Published on

भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीएसटी’ सुधारणांच्या माध्यमातून देशातील जनतेला नवरात्रोत्सवाची भेट दिली आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या खरेदीत सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. हा एक ‘बचत उत्सव’ ठरणार आहे. या सुधारणा सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध क्षेत्रांतील लोकांचे जीवन सुकर करणाऱ्या ठरतील, असा विश्वास माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
देशभरात आजपासून जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू झाल्या आहेत. याबाबत भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणतर्फे आयोजित पत्रकार परिषदेवेळी कपिल पाटील बोलत होते.
आजपासून १८ आणि ५ टक्के जीएसटी प्रणाली लागू होत असून, ३७६ वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, टीव्ही, फ्रीजसह काही कार यांचाही समावेश आहे. शैक्षणिक, वाहन, कृषीसह विविध क्षेत्राला चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय सर्वांनाच फायदा होणार आहे. दरकपातीमुळे सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही, उलट खरेदी वाढल्याने उत्पन्न अधिक वाढेल, असे पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी, जिल्हा संयोजक पी. के. म्हात्रे, मंडळ अध्यक्ष नीलेश गुरव उपस्थित होते.

यापूर्वी आयकराच्या रचनेत बदल करून मध्यमवर्गीयांना दिलासा दिला होता. नागरिकांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. यामुळे देशभरात खऱ्या अर्थाने बचतोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. ‘भारताविरोधात टेरिफ लादले जात असले तरी मोदी यांनी संकटातून संधी शोधत देशाला आत्मनिर्भरतेकडे नेले आहे’ असे ते म्हणाले. जीएसटीसंदर्भात विरोधकांनी सुरुवातीपासूनच विरोध केला; मात्र आज केंद्र सरकारला दरमहा सव्वा दोन लाख कोटी रुपयांचे उत्पन्न जीएसटीतून मिळत आहे.


स्वदेशी वस्तूंमुळे देशांचा विकास
मोदीजी नेहमीच संकटाचे संधीमध्ये रूपांतर करतात. त्यांनी स्वदेशीचा नारा दिला, खादीला प्रोत्साहन दिले. खादी वापराच्या आवाहनानंतर खादी विक्रीत २५ ते ३० टक्के वाढ झाली. स्वदेशी वस्तू परदेशी मालापेक्षा उत्कृष्ट कसा असेल, यावर भर दिला आहे. त्यामुळे भारत २०४७ पूर्वी विकसित देश बनेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तसेच भारत विकसित देश बनविण्याचे नरेंद्र मोदी यांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल, असा ठाम विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका
मोदींमुळे भविष्यात सत्ता मिळणार नाही, याची जाणीव विरोधी पक्षांना आहे. त्यामुळे ते खोटे नरेटिव्ह पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका कपिल पाटील यांनी विरोधकांवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com