उल्हासनगरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट

उल्हासनगरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट

Published on

उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : उल्हासनगर झोन ४ परिसरात मध्यरात्री पोलिसांनी धडाकेबाज ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या थेट नेतृत्वाखाली तब्बल ४२ अधिकारी व २०५ अंमलदार तैनात करून घेतलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मद्य, जुगार, अंमली पदार्थ, हत्यार कायदा ते वॉरंट अंमलबजावणीपर्यंत विविध गुन्ह्यांवर कारवाई करण्यात आली. लॉजेस, बारची तपासणी, हिस्टरीशीटर, हद्दपार व वॉंटेड आरोपींवर धडक देत पोलिसांनी कारवाई केली.
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उल्हासनगर पोलिसांकडून सातत्याने धडक मोहिमा राबवल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून १९ ते २० सप्टेंबर या मध्यरात्री (रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत) झोन ४ पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ची धडक कारवाई केली. या मोहिमेत गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय सहाय्यक आयुक्तांना थेट नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. ज्यामुळे अधिकाधिक मनुष्यबळ रस्त्यावर उतरले. या कारवाईत ४२ अधिकारी व २०५ अंमलदार सहभागी झाले होते.

दाखल गुन्ह्यांचा तपशील
कारवाईदरम्यान मद्यनिषेध कायद्यान्वये सात गुन्ह्यांची नोंद, जुगार कायद्यान्वये एक गुन्हा, एनडीपीएस कायद्यान्वये चार गुन्हे, तर कोप्टा तंबाखू कायद्यान्वये १६ गुन्हे दाखल झाले. याशिवाय वॉरंट अंमलबजावणीची सहा प्रकरणे, एमपी कायदा १४२ हत्यार प्रकरणांतर्गत एक गुन्हा, हत्यार कायद्यांतर्गत दोन गुन्हे नोंदवले. शहरातील १०४ लॉजेस व बारची तपासणी, १३६ हिस्टरीशीटर, गुंड व हद्दपार व्यक्तींची चौकशी, दोन वॉन्टेड आरोपींना अटक करण्यात आली. ३५ जणांना जाहिर नोटिसा बजावण्यात आल्या. महाराष्ट्र पोलिस एकूण ३३ गुन्हे दाखल झाले.

वाहतूक पोलिसांची कारवाई
वाहतूक पोलिसांनी आठ ठिकाणी नाकाबंदी करून २०८ वाहने तपासली. वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या पथकाच्या मदतीने ३६ हजार इतका दंड वसूल करण्यात आला. एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, अनेकांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा इशारा कारवाईतून देण्यात आला.

ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारांना ठोस संदेश देण्यात आला आहे. कायद्याला न जुमानणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असून नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित वातावरण निर्मितीत सहकार्य करावे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com