निराधार मुलांना ‘वात्सल्य’चा आधार
निराधार मुलांना ‘वात्सल्य’चा आधार
अलिबागमधील उपप्रकल्प प्रमुख वरदा महेंदळे यांच्याशी संवाद
सायली रावले ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ ः मुंबईतील वात्सल्य ट्रस्टचा एक प्रकल्प शाखा अलिबागमध्ये २००७ मध्ये सुरू करण्यात आला. या ट्रस्टच्या माध्यमातून निराधार मुलांच्या संगोपनासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून मुलांच्या जडणघडणीबरोबर विविध उपक्रम राबवले जात असून, स्वावलंबी बनवण्याचा ध्यास घेऊन उपप्रकल्प प्रमुख वरदा महेंदळे झटत आहेत.
------------------------
मुंबईतील वात्सल्य ट्रस्टमधील मैत्रिणीमुळे वरदा महेंदळे ट्रस्टच्या संपर्कात होत्या. वडील कोएसो संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक असल्याने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण याच शाळेमध्ये पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील निर्मला निकेतन संस्थेत सामाजिक शास्त्रात पदवी शिक्षण घेतले. रुपारेल कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील आशा सदन रेस्क्यू होममध्ये नोकरी मिळाली. या संस्थेत कार्यरत राहताना मुलींना टंकलेखन, शिवणकाम अशा व्यावसायिक शिक्षणातून स्वावलंबी केले, पण लग्नानंतर अलिबागला स्थायिक झाले. त्यानंतर तरुण-तरुणांचे पुनर्वसन करण्यासाठी चेतना वेंचर्स नावाची संस्था सुरू केली. टाटा कंपनीच्या ‘प्रयास’ प्रकल्पासोबत त्यांनी करार केला होता, मात्र आर्थिक नुकसानीमुळे २००० मध्ये संस्था बंद करावी लागली. यानंतर २००२ पासून जिल्हा शासकीय रुग्णालयात एचआयव्ही विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या वेळी एचआयव्हीबाधित गरोदर महिलांशी संवाद साधताना महिलांच्या मुलांच्या संगोपनाच्या प्रश्नांवर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. प्रत्येक वेळी बाधित महिलांच्या बालकांना मुंबईला पाठविले जात होते. त्यांचा वाया जाणारा वेळ लक्षात घेताना गीताताई वैशंपायन यांच्या मार्गदर्शनात संचालिका शोभा जोशी यांच्या सोबतीने २००७ मध्ये अलिबागमध्ये वात्सल्य ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
----------------------------------------
विविध अडचणींवर मात
- जिल्हा रुग्णालयातील नोकरी सोडल्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी वरदा महेंदळे यांचे पुण्यात वास्तव्य होते, मात्र २०२० मध्ये अलिबागमध्ये परतल्यानंतर त्यांनी वात्सल्य ट्रस्टसोबत काम करायचे ठरविले. ट्रस्टसोबत काम करताना विविध प्रकारचे अनुभव आले. यातूनच बालकांसाठी असणारे कायदे, योजनांचा बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली.
- दत्तक मुले घेण्याबाबत किंवा देण्याबाबत सगळ्यांना माहीत असते, पण करावा लागणारा पाठपुरावा, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ याचा विचार फार कमी होतो. अनेकदा शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळत नसल्यांची खंत त्या व्यक्त करतात.
-------------------------------
मुलांच्या भवितव्यासाठीचा खटाटोप
मुलांचे ‘ए’ फायनल प्रमाणपत्र अंतिम अहवाल न्यायालयामार्फत पोलिस यंत्रणेकडून, तर वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातूनच घ्यावे लागते. तसेच सामाजिक अहवाल शासकीय यंत्रणेकडून घ्यावा लागत असल्याने खटपट करावी लागते. नियमांना कंटाळून पालक बेकायदा मुले दत्तक घेतात. त्यामुळे पालक, मूल दोघांना होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागते, मात्र मुलांवर प्रेम करणारे पालक आणि हक्काचे घर मिळेल, या भावनेतून सर्व त्रास सहन करतो, अशी प्रांजळ कबुली त्या देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.