कॉलम

कॉलम

Published on

वसईत राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा
विरार, ता. २३ (बातमीदार) ः तुषार प्रकाशन वसई आणि आभाळमाया जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २८) सायंकाळी ४ वाजता समाज उन्नती मंडळ हॉल, माणिकपूर या ठिकाणी राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी कवीला कविता सादर केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे. उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या कवींना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे पारितोषिक व सन्मानचिन्ह मिळणार आहे. यामुळे इच्छुक कवींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाप्रमुख डॉ. अरुण घायवट यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९५४५६२३०९२/९९२१४५४८४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत केले आहे.
--------
स्वच्छता अभियान ग्रामपंचायत बोर्डी
बोर्डी (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत बोर्डी ग्रामपंचायत आणि परिसरातील शाळा, महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्रकिनारा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात चुनाबाई पेस्टलजी हकीमजी हायस्कूल, एमबी मेहता विज्ञान महाविद्यालय, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी आणि सरपंच श्याम दुबळा, सदस्य दुर्गेश राऊत, ग्रामसेविका समिता पाटील यांच्यासह शिक्षिका स्वाती सावे, अरुणा सावे आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------
जव्हार-मोखाड्यातील युवकांना मिळणार कायद्याचे शिक्षण
खोडळ्यात विधी महाविद्यायाला मान्यता, प्रवेश प्रक्रिया सुरू
मोखाडा, ता. २३ (बातमीदार) ः तालुक्यातील खोडाळा येथील गिरीवासी सेवा मंडळ संस्थेला दिल्ली बार कौन्सिल व मुंबई विद्यापीठाअंतर्गत विधी महाविद्यालय सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता जव्हार-खाडाळ्यातील युवकांना कायद्याच्या शिक्षणाची कवाडे उघडी झाली आहेत. या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, नुकतेच औपचारिपणे कार्यालयाचे उद्‍घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कदम, रघुनाथ पवार यांच्या उपस्थितीत झाले.
मोखाड्यातील डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या मुलांना पारंपरिक शिक्षणासह गिरीवासी सेवा मंडळाने येथील युवकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बदल घडून आणण्यासाठी शैक्षणिक संकुल उभे केले आहे. या शिक्षण संकुलात कायद्याचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय सुरू करून येथील तरुणांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण हा माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा आहे. शिक्षणानेच माणसाची सर्वांगीण प्रगती होते. या विचाराने गिरीवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रमणी मोहिते यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सुबोध मोहिते, सचिव प्रा. दीपक कडलग, भास्कर कोळंबे, संस्थेचे सल्लागार व ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते, प्रकाश बाविस्कर यांसह संजय साळवे, प्राचार्या ॲड. नूपुर पवार, डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. यशवंत शिद, उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, प्राचार्य प्रवर्तन काशीद, सुशांत मोहिते, हेमा मोहिते, प्रा. रघुनाथ मोरे आदी उपस्थित होते.
--------
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा - असाक्षर परीक्षार्थींची अचूक नोंद अनिवार्य
कासा (बातमीदार) ः जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी (ता. २१) परीक्षा घेण्यात आली. एकूण दोन हजार ९४४ परीक्षार्थींनी या वेळी परीक्षा दिली. यामध्ये एकूण शाळा ४५४, केंद्रे २६, विस्तार अधिकारी सात, स्वयंसेवक २८४ तर शिक्षक ९७५ यांनी काम पाहिले. या परीक्षेद्वारे असाक्षर व्यक्तींना मूलभूत साक्षरतेचे मूल्यांकन करण्यात येणार असून, सरकार स्तरावर पुढील धोरण आखणीसाठी ही आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे.
---------
मलवाडा येथे आरोग्य शिबिर संपन्न
विक्रमगड (बातमीदार) ः भाजप विक्रमगड तालुकामार्फत सेवा पंधरवडाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, मलवाडा येथे आरोग्य शिबिर पार पडले. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या सूचनेनुसार हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या वेळी सेवा पंधरवडा कार्यक्रमात स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कल्पना बारापात्रे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, मलवाडा येथे उपस्थित राहत महिलांची व गरोदर महिलांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या वेळी तालुका प्रभारी वीणा देशमुख, माजी कृषी सभापती संदीप पावडे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते मधुकर खुताडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पुंडलिक भानुशाली, जिल्हा सचिव मनोज भानुशाली, भूषण भानुशाली, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश आळशी, विक्रमगड तालुकाध्यक्ष रवींद्र भडांगे, माजी तालुका अध्यक्ष दीपक पावडे, तालुका सरचिटणीस कमळाकर भोईर या तालुका सरचिटणीस निशिकांत संख्ये व प्रकाश राऊत, आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस कैलास सहारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हरेश देसले, मलवाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिल पाटील, विक्रमगड तालुका कोषाध्यक्ष राहुल मोरे आणि महिला मोर्चा पालघर जिल्हा ममता शिरहट्टी उपस्थित होत्या.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com