पाणीटंचाईवर सिडकोकडून टँकरची मात्रा

पाणीटंचाईवर सिडकोकडून टँकरची मात्रा

Published on

पाणीटंचाईवर सिडकोकडून टँकरची मात्रा
खारघर-तळोज्यामधील मोठ्या सोसायट्यांना प्राधान्य
खारघर, ता. २३ (बातमीदार) : खारघर व तळोजा वसाहतींमध्ये पाणीपुरवठ्याचा दाब कमी झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीत सिडको प्रशासनाने दररोज २०० हून अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला असून, मोठ्या वसाहतींना प्राधान्याने पाणी दिले जात आहे.
खारघर वसाहतीत दररोज सुमारे ८० एमएलडी पाण्याची, तर तळोजा वसाहतीत सुमारे १५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या तळोज्याला एमआयडीसीकडून फक्त सात एमएलडी पुरवठा होत असल्याने उर्वरित तुटवडा भरून काढण्यासाठी खारघरच्या पाणीसाठ्यातून जवळपास आठ एमएलडी पाणी तळोज्याला वळते केले जात आहे. परिणामी खारघर वसाहतीतील अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा दाब लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. सिडकोच्या हेटवणे धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी पाणी वाहून नेणाऱ्या जलबाहिनीचा व्यास कमी असल्याने पुरवठा मर्यादित आहे. सध्या सिडकोकडून अधिक क्षमतेच्या पाइपलाइनचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले, मात्र तोपर्यंत नागरिकांना पुरेसा पुरवठा मिळावा म्हणून टँकरमार्फत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.
सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, रोज १५ टँकर उपलब्ध असून, त्याद्वारे सुमारे २०० टँकर इतका पुरवठा विविध सोसायट्यांना केला जात आहे. मोठ्या सोसायट्यांना प्रत्येकी चार ते पाच टँकर दिले जात असून, छोट्या सोसायट्यांना एका टँकरचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीटंचाई भासत असलेल्या भागातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
...............
विशेष म्हणजे, ऐन पावसाळ्यातच खारघर व तळोजा परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हेटवणे धरणात मुबलक पाणी असतानाही तांत्रिक कारणांमुळे पुरवठा नीट होत नाही, हा मोठा विरोधाभास आहे. पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी सातत्याने स्‍थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com