ओवे कॅम्प गावातील पाणी समस्या मिटणार
ओवे कॅम्प गावातील पाणी समस्या मिटणार
जलकुंभ उभारणीसाठी सिडकोकडून जागा उपलब्ध; ग्रामस्थांना दिलासा
खारघर, ता. २३ (बातमीदार) : खारघरमधील कोयना प्रकल्पग्रस्त ओवे कॅम्प गावासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेली पाणी समस्या लवकरच सुटणार आहे. पनवेल महापालिकेच्या पुढाकाराने गावात जलकुंभ उभारणीसाठी अखेर सिडकोने जागा उपलब्ध करून दिली असून, ग्रामस्थांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.
१९६२ मध्ये कोयना प्रकल्प उभारणीदरम्यान अनेक गावांचे पुनर्वसन करताना शासनाने सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अंतर्गत ओवे कॅम्प गावाची निर्मिती झाली. प्रारंभी ग्रामपंचायतीच्या काळात रस्ते, गटारे आदी मूलभूत कामे झाली; मात्र महापालिका अस्तित्वात आल्यानंतरही पुरेशा नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. गावातील पूर्वीचा जलकुंभ कोरडा पडला असून, सिडकोकडून तीन-चार दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. पाणी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने जलकुंभ उभारणीसाठी मंजुरी दिली, परंतु जागेअभावी हे काम प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर ओवे कॅम्प संघर्ष समिती कोयना प्रकल्पग्रस्त नियोजितचे पदाधिकारी जयराम जाधव यांनी सिडकोचे तत्कालीन संचालक तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सिडकोच्या भूमापन विभागाने अखेर पालिकेला सेक्टर-३० डोंगराच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर पालिकेने तातडीने ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या एजन्सीकडे ५४ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम सोपवले.
............
गावातील पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी शासन व सिडको दरबारी सतत पाठपुरावा केला. टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्यामुळेच सिडकोने जागा उपलब्ध करून दिली. पालिकेने तत्काळ एजन्सी नेमून काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाल्याचे ओवे कॅम्प संघर्ष समितीचे पदाधिकारी जयराम जाधव यांनी सांगितले, तर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास चव्हाण यांनी सांगितले की, पावसाळा संपताच जलकुंभ उभारणीचे काम हाती घेण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.