जनसुरक्षेसाठी पोलिसांची अष्टभुजा

जनसुरक्षेसाठी पोलिसांची अष्टभुजा

Published on

जनसुरक्षेसाठी पोलिसांची अष्टभुजा
संकटकाळात मदतीसाठीची हेल्पलाईन जारी
अलिबाग, ता.२४(वार्ताहर)ः सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलिस प्रशासनाने संकटकाळात तातडीने मदत मिळावी, यासाठी आठ हेल्पलाईन जारी केल्या आहेत. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, बालकांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन जारी केली आहे.
राज्यात नवरात्रोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. गर्दीच्या ठिकाणी महिला सुरक्षा, चोरी, इतर आपत्तीचे प्रसंग उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे दैनंदिन आयुष्यातही नागरिकांना कठिण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशावेळी प्रत्येक वेळी पोलिस प्रत्यक्ष उपलब्ध राहतील असे नसल्याने पोलिस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना संकटकाळात तातडीने मदत मिळावी, यासाठी आठ हेल्पलाईन जारी केल्या आहेत.
---------------------------
येथे संपर्क साधा
महाराष्ट्र पोलिस - ११२
सायबर - १९३०
महिला - १०९१
बालक - १०९८
आपत्ती व्यवस्थापन - १०८
अग्निशमन सेवा - १०१
रेल्वे सेवा - १३९ किंवा १५१२
ज्येष्ठ नागरिक - १०९०

Marathi News Esakal
www.esakal.com