शिक्षण परिषदेत महापालिकेचे कौतुक

शिक्षण परिषदेत महापालिकेचे कौतुक

Published on

शिक्षण परिषदेत महापालिकेचे कौतुक
शालेय पटसंख्यावाढीसाठीच्या प्रयत्नांबाबत प्रशंसा
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) ः पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शाळांमधील घटती पटसंख्या (विद्यार्थ्यांची संख्या) वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची विशेषतः प्रशंसा करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य व शिक्षण या दोन अत्यावश्यक क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले. शैक्षणिक दर्जा आणि सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक ठोस उपाययोजना राबवल्या.

पुणे येथील परिषदेत राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले. यामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. घटती पटसंख्या थांबवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होणे ही एक गंभीर समस्या होती. या समस्येवर मात करण्यासाठी आयुक्तांनी त्रिसूत्री कार्यक्रमावर भर दिला.

इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा :
शाळा इमारतींचे नूतनीकरण
स्वच्छता व सुरक्षितता
वर्गखोल्यांमध्ये आधुनिक सुविधा

शालेय साहित्य व सोयीसुविधांचा वेळेवर पुरवठा :
वह्या, पुस्तके, गणवेश यांचे वेळेवर वाटप
विद्यार्थ्यांसाठी सहलींचे आयोजन, क्रीडा स्पर्धा
गुणवत्तापूर्ण ‘मिड डे मील’ (दुपारचे जेवण)

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे उपक्रम :
दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचण्या
चाचणीच्या आधारे शिक्षण परिषदांचे आयोजन
सुधारणा योग्य ठिकाणी त्वरित कृती

परिणामकारक बदल
विविध प्रयत्नांमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये लक्षणीय बदल घडले. पहिल्या शिक्षण परिषदेनंतर निपुण (कौशल्ययुक्त) विद्यार्थ्यांचे प्रमाण १८ टक्क्यांवरून ४४ टक्क्यांपर्यंत वाढले. ४०० पेक्षा अधिक नवीन विद्यार्थ्यांनी यावर्षी महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेतला. नव्याने सुरू झालेल्या सात सेमी इंग्लिश माध्यम शाळांना पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती
शाळांमधील दर्जा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेत पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी शिक्षक, पालक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिक्षकांच्या गरजा व प्रशासनाच्या योजना यांचा समन्वय साधण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल ठरले आहे.

उच्चस्तरीय उपस्थिती व प्रशंसा
राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, प्रधान सचिव शिक्षण, राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलांचे सर्वांनी एकमुखाने कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com