रेकाॅर्डवरील हद्दपार आरोपी जेरबंद
रेकाॅर्डवरील हद्दपार आरोपी जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ ः ठाणे, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्याच्या महसूल हद्दीतून १८ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आलेल्या आकाश मराठे (२९) हा कोलशेत, आझादनगर येथे आला असताना, त्याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली. ठाणे खंडणीविरोधी पथक मंगळवार (ता. २३) कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे फरारी हद्दपार आरोपींचा शोध घेत असताना पोलिस हवालदार शैलेश शिंदे यांना आझादनगर कोलशेत रोड या ठिकाणी कापूरबावाडी पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील आकाश मराठे आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन मराठे याला ताब्यात घेतले. तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.