थोडक्यात बातम्या नवी मुंबई
फिजिओ मंथन २०२५ : नवी मुंबई-रायगड सरस
नवी मुंबई, ता. २५ ः भारतीय फिजिओथेरपीस्ट्स असोसिएशनच्या फिजिओ मंथन २०२५ राष्ट्रीय परिषदेत नवी मुंबई व रायगड शाखेला भारताचा सर्वोत्तम जिल्हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षभरातील नवोन्मेषी कामगिरी व समाजाभिमुख उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हा पुरस्कार दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये बन्सुरी स्वराज यांच्या हस्ते प्रदान झाला. या सोहळ्यास आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव झा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा सन्मान स्विकारण्यासाठी नवी मुंबई टीमला विशेष आमंत्रण देऊन दिल्लीला बोलावण्यात आले होते. हा पुरस्कार सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांच्या हस्ते नवी दिल्लीतील ऐतिहासिक कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास आयएपी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव झा, राष्ट्रीय कोषाध्यक्ष व महिला विभागप्रमुख डॉ. रुची वर्श्नेय, तसेच आयएपी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ. अमित गिरे यांची उपस्थिती लाभली. हा मानाचा सन्मान नवी मुंबई व रायगड आयएपी शाखेच्या टीमने केलेल्या अथक परिश्रमांचे व नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे सांगण्यात आले. या पुरस्कारामुळे नवी मुंबईने फिजिओथेरपी क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर नवा आदर्श निर्माण केला आहे.
...............
नेरूळमध्ये नशामुक्ती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई (वार्ताहर) : नेरूळ येथील एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र आणि नेरूळ पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २४) भव्य नशामुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विद्यार्थ्यांसह पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. नेरूळ येथील एसआयईएस कॉलेज येथून काढण्यात आलेली नशामुक्ती रॅली नेरूळ रेल्वेस्थानकापर्यंत काढण्यात आली. या वेळी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यसनविरोधी फलक आणि घोषवाक्ये घेऊन रॅलीत सहभाग घेतला होता. या वेळी विद्यार्थ्यांनी नशामुक्तीच्या घोषणांनी नेरूळमधील रस्ते आणि गल्ल्या दणाणून सोडल्या. नेरूळ रेल्वेस्थानकाच्या परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी नशामुक्तीवर प्रभावी आणि जोशपूर्ण पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीत प्रा. कामिनी ठाकूर, योगेंद्र दळवी, तनिश हजारी हे एनएसएस अधिकारी, अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अजित मगदूम, मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, वसंत वळकुंडे, मनीषा वळकुंडे, जालिंदर यमगर यांच्यासह नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलिस निरीक्षक पंकज घाडगे आणि पोलिस निरीक्षक संजय लाड आदी उपस्थित होते.
.....................
नवी मुंबई जिल्हा युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबई शिवसेना शिंदे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत प्रभाग, वॉर्ड, विधानसभा तसेच जिल्हास्तरावर मिळून तब्बल ३५० हून अधिक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी आगामी निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर शिवसेना व युवासेनेचे संघटन अधिक सशक्त, गतिमान व भक्कम करण्यास निर्णायक ठरेल. शिवसेनेचा विचार प्रत्येक घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी ही कार्यकारिणी समर्थपणे पार पाडेल, असा ठाम विश्वास नवी मुंबई युवा सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हा युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे आणि युवासेना सचिव किरण साळी यांच्या विशेष पुढाकारामुळे ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या प्रक्रियेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के व शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.