नवी, पनवेल पान २ पट्टा

नवी, पनवेल पान २ पट्टा

Published on

सुरक्षित रस्ते प्रवासाचा हेल्मेट वाटपातून संदेश
पनवेल (बातमीदार) ः रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी नवी पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेटवाटप उपक्रम राबविण्यात आला. पटेल इंजिनिअरिंग कंपनी, खारपाडा यांच्या सौजन्याने हा उपक्रम करण्यात आला. यामध्ये वाहतूक पोलिस अंमलदारांसह स्थानिक नागरिकांना हेल्मेट वाटप करून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला नवी पनवेल वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत खराटे उपस्थित होते. त्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे. अपघात टाळण्यासाठी आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी हेल्मेट परिधान करणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. या उपक्रमात पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांच्यासह कंपनीतील कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हेल्मेट वाटपामुळे नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती झाली असून वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
ः-----------------------------------
...अखेर पालिकेकडून मैदानाची स्वच्छता
खारघर (बातमीदार) ः सेक्टर १६ केपीसी शाळेसमोर असलेल्या खेळाच्या मैदानाची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मैदानात चार ते पाच फुटापर्यंत गवत वाढले होते. तसेच खुल्या व्यायामशाळेभोवती पाण्याचे डबके साचले होते. हा परिसर खाडीलगत असल्यामुळे साप, विंचू यांचा वावर आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीवास धोका असल्यामुळे पालक, मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. १९) ‘सकाळ’मध्ये ‘खारघरमधील खेळाच्या मैदानाची दुरवस्था’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच मैदानाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे.
--------------------------------------
पालिका पदोन्नतीत भ्रष्टाचाराचा आरोप
पनवेल (बातमीदार) ः पनवेल महापालिकेत पदोन्नती प्रक्रियेत नियमभंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने चौकशीची मागणी केली आहे. माहिती अधिकार अर्जातून उघड झालेल्या माहितीप्रमाणे, २०२१ पासून पदोन्नती मिळालेल्या अनेक कर्मचारी/अधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे- जात प्रमाणपत्र वैधता, तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पती/पत्नी हमीपत्र वेळेत सादर केलेले नाही. तरीही त्यांना पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन शासन निर्णय असूनही कागदपत्र पडताळणीशिवाय पदोन्नती देण्यात आली, तसेच अपात्र व्यक्तींना पात्र ठरवण्यात आले असण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com