हैदराबादची पेडम्मा माता कैलास नगरची माऊली

हैदराबादची पेडम्मा माता कैलास नगरची माऊली

Published on

हैदराबादची पेडम्मा माता कैलास नगरची माऊली
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कैलासनगर येथील जनसेवा मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सवात कैलासनगरची माऊली अर्थात हैदराबाद तेलंगणा राज्यातील पेडम्मा माता विराजमान झाली आहे. विशेष बाब म्हणजे देवीची मूर्ती पूर्णपणे १०० टक्के पर्यावरणपूरक असून, शाडू मातीपासून बनविण्यात आली आहे. बदलापुरातील मूर्तिकार रवी कुंभार यांनी ही मूर्ती घडवली असून, पेडम्मा मातेच्या दर्शनासाठी भक्तांची संपूर्ण १० दिवस गर्दी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
तेलंगणा राज्यातील पेडम्मा मंदिर साधारणपणे ११व्या शतकात तत्कालीन राजघराणे यांनी स्थापना केली, असे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. पेडम्मा म्हणजे आईंची आई म्हणजेच सर्वश्रेष्ठ माता. हैदराबादमधील पेडम्मा मंदिर या प्रदेशाच्या समृद्ध, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा पुरावा आहे. शक्तीचा अवतार असलेल्या शक्तिशाली देवी पेडम्मा यांना समर्पित, मंदिर हजारो भक्त आणि पर्यटकांना आकर्षित करते, जे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तिच्या शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी येतात. वास्तुकला, उत्सव आणि खोलवर रुजलेले महत्त्व यामुळे, पेडम्मा मंदिर केवळ पूजास्थळ नाही तर तेलंगणाच्या शाश्वत आध्यात्मिक शक्तीचे प्रतीकदेखील मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com